शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सिंदेवाहीत गरबा व दांडिया स्पर्धेचे पुरस्कार वितरण

By admin | Updated: October 17, 2016 00:48 IST

येथील प्रभात बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने नवरात्रनिमित्त सिंदेवाही येथील समाज मंदिरात गरबा व दांडिया महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

निबंध स्पर्धाही आयोजित : विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसादसिंदेवाही : येथील प्रभात बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने नवरात्रनिमित्त सिंदेवाही येथील समाज मंदिरात गरबा व दांडिया महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. यानिमित्त आयोजित स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.यादरम्यान वन, वन्यप्राणी व पर्यावरण या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. तसेच पतंजली योग समितीतर्फे सकाळी निशुल्क योग व प्राणायम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात आरोग्याबद्दल जनजागृती करण्यात आली. या संस्थेतर्फे नवरात्रनिमित्त गरबा व दांडीया स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. ही स्पर्धा १ ते १३ आॅक्टोंबरपर्यंत घेण्यात आली. या स्पर्धेसाठी परीक्षकाकडून विजेत्या स्पर्धकांची निवड करण्यात आली. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक सागर बावनथडे यांनी पटकाविला. त्याला वाशिंग मशीन देण्यात आले. द्वितीय पुरस्कार सोनाली जाधव हिने पटकाविले. तिला २० इंची एलईडी टीव्ही, तृतीय क्रमांक कुमारी दोनाडकर हिला हिरो रेंजर सायकल व इतर सात विजेत्या स्पर्धकांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले. या स्पर्धेव्यक्तीरिक्त दांडिया सजावट स्पर्धा घेण्यात आली. त्यात प्रथम क्रमांक सायली नागरगोजे हिने पटकाविला तर पब्लिक पोलमध्ये सुशील बावने सर्वात जास्त मतदान घेवून लोकप्रिय ठरला. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ लोनवाही ग्रा.पं. सरपंच गणेश गोलपल्लीवार, जि.प. सदस्य नागराज गेडाम, माजी सभापती अरविंद जैस्वाल, डॉ.सतीश चिंतावार, पोलीस निरीक्षक परघने, सहायक अभियंता झाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. विजेत्या स्पर्धकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष रितेश घुमे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. संचालन प्रज्ञा रामटेके व पोरस गेडाम यांनी केले. यशस्वीतेसाठी सुरेश रामटेके, संजय रामटेके, निखील डांगे, प्रशांत बनकर, हर्षल गुज्जनवार यांनी परिश्रम घेतले.(पालक प्रतिनिधी)