शेतकऱ्यांनी आत्मसंरक्षणाकरिता बंदूक हाती घ्यावी का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:30 AM2018-12-19T00:30:40+5:302018-12-19T00:31:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वरोरा : जंगलानजीकच्या शेतातील पिके वन्यप्राणी उद्ध्वस्त करीत आहे. वन्यप्राणी शेतकºयांवर हल्ले करून ठार करीत आहे. ...

Should the farmers take guns for self defense? | शेतकऱ्यांनी आत्मसंरक्षणाकरिता बंदूक हाती घ्यावी का?

शेतकऱ्यांनी आत्मसंरक्षणाकरिता बंदूक हाती घ्यावी का?

Next
ठळक मुद्देबाळू धानोरकरांचा अधिकाºयांना संतप्त सवाल : अर्र्जूनीत घेतली ग्रामस्थांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : जंगलानजीकच्या शेतातील पिके वन्यप्राणी उद्ध्वस्त करीत आहे. वन्यप्राणी शेतकºयांवर हल्ले करून ठार करीत आहे. अशा परिस्थितीमुळे शेतकºयांच्या कुटुंबीयांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. वन विभाग वन्य प्राण्यांचा योग्य बंदोबस्त करीत नसल्याने आत्मसंरक्षणाकरिता शेतकऱ्यांना आता हातात बंदूक घ्यावी काय? असा संतप्त सवाल आमदार बाळु धानोरकर यांनी मंगळवारी अर्जुनी गावात अधिकाºयांच्या बैठकीत केला.
वरोरा तालुक्यातील अर्जुनी गावात मागील दीड महिन्यात बिबट्याने हल्ला करून तीन व्यक्तींचा बळी घेतला. एका शाळकरी मुलाला गंभीर जखमी केले. या पार्श्वभूमीवर आमदार बाळू धानोरकर यांनी वन (बफर कोअर) महसुल, पंचायत, कृषी अधिकारी व ग्रामस्थांची अर्जूनीत बैठक घेतली. यावेळी ग्रामस्थांनी आपले गाव स्वच्छ ठेवावे, शौचलयास उघड्यावर जावू नये याकरिता आमदार धानोरकर यांनी ५० व वनविभागाने ५० शौचालय अर्जुनी गावात बांधणार असल्याची घोषणा केली. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पावलेल्यांच्या वारसांना स्थायी नोकरी देण्याची मागणी आमदार धानोरकर यांनी केली. अर्जुनी गावाच्या परिसरातील भानुसखिंड येथील नाल्यावर बंधारा बांधून वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे तसेच शेतात सौर उर्जेचे कुंपण व दिवे लावण्यात यावे, असे निर्देश आमदार धानोरकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
पिके शेतातून आणण्याकरिता वनविभागाने शेतकºयांना कर्मचारी व वाहन, मजुरांना दरमहा धान्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश महसुल विभागाला देत ग्रामस्थांनी अशा मजुरी करणाºया कुटुंबीयांची यादी सादर करावी, असे आवाहनही आमदार धानोरकर यांनी यावेळी केले.
यावेळी अर्जुनी गावाच्या सरपंच यामिनी बोथले, पोलीस पाटील झिंगरे, वनाधिकारी गजेंद्र नरवने, एसीएफ दिव्या भारती, डिएफओ कोअर लडकते, आरएफओ आर. जी. मून, तहसीलदार सचिन गोसावी, पोलीस उपनिरीक्षक तिवारी, तालुका कृषी अधिकारी व्ही. आर. प्रकाश, संवर्ग विकास अधिकारी संजय बोदेले, सहायक संवर्ग विकास अधिकारी बोबडे, बाजार समितीचे उपसभापती राजू चिकटे, नगरसेवक राजू महाजन, वाहतुक सेना जिल्हा प्रमुख प्रमोद मगरे, निलेश भालेराव, बाजार समिती संचालक बंडू शेळकी, योगेश खामनकर आदी उपस्थित होते.

Web Title: Should the farmers take guns for self defense?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.