शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

धक्कादायक! दारूच्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 11:45 IST

दारूबंदी घोषित केलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्या पोलीस निरीक्षक छत्रपती किसनराव चिडे यांना त्याच वाहनाने चिरडून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली.

ठळक मुद्देचंद्रपूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: दारूबंदी घोषित केलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्या पोलीस निरीक्षक छत्रपती किसनराव चिडे यांना त्याच वाहनाने चिरडून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली.मौशी रस्त्याने पवनी - तोरगाव मार्गे दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती ठाणा प्रभारी चिडे यांना मिळताच ते पी एस आय ए.एस. मलकापूरे , संदीप कोवे आणि पितांबर खरकाटे, रामकृष्ण बोधे  यांना सोबत घेऊन मौशीकडे निघाले. दारूची अवैध वाहतूक करणारी गाडी दृष्टीपथात येताच त्यांनी गाडीचा पाठलाग सुरू केला. यादरम्यान मौशीजवळील गोसे खूर्द नहराजवळ समोरून येणाºया ट्रॅक्टरला या गाडीने धडक दिली व दारूची वाहतूक करणारी गाडी थांबली. त्यामुळे पोलिस गाडीतून पाठलाग करणारे पोलिस गाडीतून खाली उतरले व दारूची वाहतूक करणाºया गाडीकडे पायी चालू लागले . तेवढयात दारूची वाहतूक करणारी गाडी रिव्हर्स घेवून पोलिसांच्या अंगावर घालण्यात आली. अचानक झालेल्या या प्रकाराने पोलिस भांबावले. मात्र तिघे चपळाईने बाजूला झाले. पण प्रभारी ठाणेदार छत्रपती चिडे यांचे अंगावरून गाडी गेल्याने ते जागीच ठार झाले.

 त्यांची हत्या दारूविक्रेत्यांनी घडवून आणल्याची परिसरात चर्चा आहे. छत्रपती चिडे हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या या हत्येबद्दल नागरिकांत हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू