धक्कादायक! दारूच्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 11:45 IST2018-11-06T11:37:44+5:302018-11-06T11:45:39+5:30

दारूबंदी घोषित केलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्या पोलीस निरीक्षक छत्रपती किसनराव चिडे यांना त्याच वाहनाने चिरडून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली.

Shocking! A police officer who pursued the liquor vandalized crushed by same vehicle | धक्कादायक! दारूच्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला चिरडले

धक्कादायक! दारूच्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला चिरडले

ठळक मुद्देचंद्रपूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: दारूबंदी घोषित केलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्या पोलीस निरीक्षक छत्रपती किसनराव चिडे यांना त्याच वाहनाने चिरडून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली.
मौशी रस्त्याने पवनी - तोरगाव मार्गे दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती ठाणा प्रभारी चिडे यांना मिळताच ते पी एस आय ए.एस. मलकापूरे , संदीप कोवे आणि पितांबर खरकाटे, रामकृष्ण बोधे  यांना सोबत घेऊन मौशीकडे निघाले. दारूची अवैध वाहतूक करणारी गाडी दृष्टीपथात येताच त्यांनी गाडीचा पाठलाग सुरू केला. यादरम्यान मौशीजवळील गोसे खूर्द नहराजवळ समोरून येणाºया ट्रॅक्टरला या गाडीने धडक दिली व दारूची वाहतूक करणारी गाडी थांबली. त्यामुळे पोलिस गाडीतून पाठलाग करणारे पोलिस गाडीतून खाली उतरले व दारूची वाहतूक करणाºया गाडीकडे पायी चालू लागले . तेवढयात दारूची वाहतूक करणारी गाडी रिव्हर्स घेवून पोलिसांच्या अंगावर घालण्यात आली. अचानक झालेल्या या प्रकाराने पोलिस भांबावले. मात्र तिघे चपळाईने बाजूला झाले. पण प्रभारी ठाणेदार छत्रपती चिडे यांचे अंगावरून गाडी गेल्याने ते जागीच ठार झाले.

 त्यांची हत्या दारूविक्रेत्यांनी घडवून आणल्याची परिसरात चर्चा आहे. छत्रपती चिडे हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या या हत्येबद्दल नागरिकांत हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Shocking! A police officer who pursued the liquor vandalized crushed by same vehicle