शिंदे यांचा मताधिक्याचा विक्रम आजही अबाधित

By Admin | Updated: October 3, 2014 01:24 IST2014-10-03T01:24:22+5:302014-10-03T01:24:22+5:30

निवडणुकीचे ‘काऊंट डाऊन’ सुरू झाले आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये काल काय घडलं, आज काय घडत आहे. यावरच उद्याच भविष्य अवलंबून आहे.

Shinde's record of franchise remains unchanged | शिंदे यांचा मताधिक्याचा विक्रम आजही अबाधित

शिंदे यांचा मताधिक्याचा विक्रम आजही अबाधित

सचिन सरपटवार भद्रावती
निवडणुकीचे ‘काऊंट डाऊन’ सुरू झाले आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये काल काय घडलं, आज काय घडत आहे. यावरच उद्याच भविष्य अवलंबून आहे. सगळेच बारकावे शोधण्याच्या राजकारणी नेते प्रयत्नात आहेत. गेल्या ५२ वर्षात पार पडलेल्या ११ विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत या निवडणुकीत एक लाख ९३ हजार ८०९ नविन मतदारांची वाढ झाली आहे. १९६२ च्या निवडणुकीत एकूण मतदार ७४ हजार ८४५ तर होऊ घातलेल्या निवडणुकीत एकूण मतदार संख्या दोन लाख ६८ हजार ६५४ इतकी आहे.
१९६२ पासून २००९ पर्यंत १२३ उमेदवारांनी निवडणुकांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला. या निवडणुकीत १८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. म्हणजेच १९६२ ते २०१४ पर्यंतच्या निवडणुकांमध्ये एकूण १३१ उमेदवारांनी लढविली. १९७२ च्या निवडणुकीत सर्वात कमी म्हणजे तीन उमेदवार रिंगणात होते. सर्वात जास्त उमेदवार १९९० व १९९५ च्या निवडणुकीत रिंगणात होते. त्यांची संख्या २० इतकी होती.
१९६२ पासून आतापर्यंत पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजयी होण्याचा मान नीळकंठराव शिंदे यांना जातो. त्यांचा विक्रम आजही अबाधित आहे. निळकंठराव शिंदे यांनी आपले प्रतिस्पर्धी दादासाहेब देवतळेंवर तबल्ल २२ हजार ४५९ एवढ्या विक्रमी मतांनी विजय मिळविला होता. शिंदे यांना ४५ हजार ४७५ तर देवतळे यांवना २३ हजार १६ मते मिळाली होती.
तसेच १९६७ मध्ये आतापर्यंत सर्वात कमी मतांनी विजयी झाले होते ते आर. देवतळे, आर. देवतळे यांनी व्ही. देवतळे यांचा फक्त एक हजार ६६२ मतांनी पराभव केला होता. १९९० साली अपक्ष उमेदवार डॉ. येशंबरे बाबुराव गोविंदराव यांना आतापर्यंतची सर्वात कमी म्हणजे फक्त ५८ इतकी मते मिळाली होती.
आतापर्यंत झालेल्या अटीतटींच्या निवडणुकांमध्ये १९६७ मधील आर. जे. देवतळे विरुद्ध व्ही. देवतळे, १९८० मधील दादासाहेब देवतळे विरुद्ध आडकुजी पाटील नन्नावरे (अपक्ष), २००९ सालची संंजय देवतळेविरुद्ध सुरेश उर्फ बाळू धानोरकर तसेच १९९० साली झालेल्या मोरेश्वर टेमुर्डे विरुद्ध बाबा वासाडे यांच्या निवडणुकांचा समावेश आहे.
विधानसभेच्या आतापर्यंतच्या ११ टर्ममध्ये वरोरा- भद्रावती विधानसभा क्षेत्रात देवतळेंचे साम्राज्य राहिले आहे. अपक्ष म्हणून निवडून येणाचा मान मोरेश्वर टेमुर्डे यांना मिळाला आहे. वरोरा- भद्रावती क्षेत्राचे पहिले आमदार आर.के. पाटील (१९४६) त्यानंतर आम. महादेवराव पावडे, आ. नारायण माथनकर होते. शिंदे यांचे मताधिक्य आजही अबाधित आहे.

Web Title: Shinde's record of franchise remains unchanged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.