शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

ती सांभाळतेय लाख महिलांची आरोग्य जबाबदारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 05:00 IST

डॉ. शालिनी तरोने असे या कर्तव्यदक्ष महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव. कोरपना तालुक्यातील मांडवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्या कार्यरत आहेत. विदर्भ आयुर्वेदिक महाविद्यालय अमरावती येथे बी.ए.एम.एस.चे वैद्यकीय शिक्षण घेऊन २००८ साली त्या वैद्यकीय सेवेत रुजू झाल्या. ताडाळी, तोहोगाव, जिवतीनंतर त्या २०१५ पासून मांडवा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देत आहेत. या परिसरात एकही महिला वैद्यक नाही.

ठळक मुद्देअतिदुर्गम भागात सेवा : पेशाने डॉक्टर आणि महिलांसाठी आहे देवदूत

जयंत जेनेकरलोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : सध्या कोरोनाचा भयावह काळ सुरू आहे. आरोग्याचे प्रश्न मोठे आहेत. या परिस्थितीतही कोरपना तालुक्यातील आदिवासीबहुुल भागात महिलांच्या आरोग्यावर ती एकटीच उपचार करत आहे. दुर्गम भागातील सेवेच्या अनुभवाच्या जोरावर ती वैद्यकीय अधिकारी लाख महिलांची जबाबदारी यशस्वी सांभाळत असून महिला सक्षमीकरणाचा परिचय देत आहे.डॉ. शालिनी तरोने असे या कर्तव्यदक्ष महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव. कोरपना तालुक्यातील मांडवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्या कार्यरत आहेत. विदर्भ आयुर्वेदिक महाविद्यालय अमरावती येथे बी.ए.एम.एस.चे वैद्यकीय शिक्षण घेऊन २००८ साली त्या वैद्यकीय सेवेत रुजू झाल्या. ताडाळी, तोहोगाव, जिवतीनंतर त्या २०१५ पासून मांडवा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देत आहेत. या परिसरात एकही महिला वैद्यक नाही. त्यामुळे डॉ. तरोने यांना जवळपास एक लाख महिला व अन्य रुग्णांची आरोग्यविषयक चिकित्सक जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळावी लागत आहे. त्यातही त्या अनेक जोखीम पत्करून तत्परतेने सकारात्मक काम करीत आहेत.मांडवा आरोग्य केंद्राअंतर्गत येणारी गावे आदिवासीबहुल व अतिदुर्गम भागात वसली आहेत. या क्षेत्रात अनेक सुविधांची उणीव आहे. तेलंगणा सीमेवरील थिप्पापासून तर कोरपनापर्यंतचा भाग या केंद्राच्या कार्यक्षेत्रात येतो. त्यामुळे येथे नियमित उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्या सर्व रुग्णांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्यावर त्या उपचार करीत आहेत. त्यांच्या वैद्यकीय सेवेने पंचक्रोशीत महिलांसाठी  ‘देवदूत’ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.  दुर्गम अशा मांडवा आरोग्य केंद्राच्या प्रमुख आरोग्य अधिकारी म्हणून व्यवस्थापनाची जबाबदारी त्या सांभाळत आहेत.  कोरपना तालुक्यातील परिसरात त्या एकमेव महिला डॉक्टर आहेत. 

 

टॅग्स :doctorडॉक्टर