शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

वीज केंद्रातून लाकूड चोरुन नेणारा ट्रक जप्त

By admin | Updated: February 9, 2015 23:10 IST

वीज केंद्र परिसरातून अवैधरित्या झाडांची कत्तल करुन ट्रकमध्ये लाकूड चोरुन नेत असताना, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ट्रक पकडला. याबाबत दुर्गापूर पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली

दुर्गापूर : वीज केंद्र परिसरातून अवैधरित्या झाडांची कत्तल करुन ट्रकमध्ये लाकूड चोरुन नेत असताना, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ट्रक पकडला. याबाबत दुर्गापूर पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली असून सदर घटना रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन ट्रक चालकाला अटक केली असून ट्रक जप्त करण्यात आला आहे. ट्रकमध्ये २५ हजार किंमतीचे १० टन लाकूड आहे. चंद्रपूर वीज निर्मिती केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. सर्वत्र हिरवेगार झाडे असल्याने येथे उन्हाळ्यातही गारवा असतो. मात्र अलिकडे येथील मोठमोठी वृक्षे चक्क बुंध्यापासून तोडून चोरुन नेल्या जात आहेत. त्यामुळे येथील अर्धेअधीक वृक्ष लंपास झाली. रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास लाकडाने भरलेला ट्रक क्र. एम.एच. ३१ एम- ४५५० वीज केंद्राच्या परिसरातून गेट पास वीना जात असताना, सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ट्रक चालक रमेश ऊर्फ बाबा रामदास नन्नावरे (४०) रा. बाबुपेठ वॉर्ड याचा ट्रक अडवून चौकशी केली. त्यात त्यांच्याकडे वीज केंद्रातून सामान बाहेर घेऊन जाण्याचा गेटपास नसल्याचे आढळून आले. वीज केंद्राच्या व्यवस्थापनाने याबाबत दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली. यावरुन पोलिसांनी चालकाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला व त्यास अटक करुन ट्रक जप्त केला. (वार्ताहर)