शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारुप्रकरणी माजी नगराध्यक्षाला दुसऱ्यांदा अटक

By admin | Updated: April 13, 2016 01:21 IST

नगर परिषद वरोराचे अध्यक्षपद भूषविलेल्या माजी नगराध्यक्षाला अवैध दारु बाळगल्या प्रकरणी १२ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास

डीबी पथकाची कारवाई : वरोरा शहरातील प्रकारवरोरा : नगर परिषद वरोराचे अध्यक्षपद भूषविलेल्या माजी नगराध्यक्षाला अवैध दारु बाळगल्या प्रकरणी १२ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास वरोरा पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अटक केली. काही दिवसापूर्वी याच माजी नगराध्यक्षाला त्याच्या एका सहकाऱ्यासह अवैध दारु बाळगल्याप्रकरणी वरोरा पोलिसांनी अटक केली होती, हे विशेष!मेघश्याम दिगांबर सिडाम असे अटक करण्यात आलेल्या माजी नगराध्यक्षाचे नाव आहे. वरोरा शहरातील अंबादेवी वॉर्डातील रहिवासी असलेले मेघश्याम सिडाम यांनी काही काळ वरोरा पालिकेचे अध्यक्षपद भूषविले होते. अंबादेवी वॉर्डातील आपल्या निवासस्थानी देशी व विदेशी मद्याची विक्री मेघश्याम सिडाम करीत असल्याची गुप्त माहिती वरोरा पोलिसांच्या डिबी पथकास मिळाली. यावरुन ३ एप्रिल रोजी डीबी पथकाच्या सदस्यांनी धाड टाकून मेघश्याम सिडाम व त्याच्या एक सहकाऱ्यास देशी विदेशी मद्याच्या बॉटलसह ताब्यात घेऊन अटक केली होती. न्यायालयाने दोघांनाही दुसऱ्या दिवशी जामीन मंजूर केला होता. सुटका झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच मेघश्याम सिडाम याने अवैधरित्या दारु विक्री करण्यासाठी देशी दारुच्या बॉटल आणून घरानजीकच्या झाडामध्ये लपवून ठेवल्या होत्या व त्या ग्राहकांना विकत होता, याची माहिती वरोरा पोलिसांच्या डीबी पथकास मिळाली. १२ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकली, असता देशी दारूच्या २५ बॉटल आढळून आल्याने माजी नगराध्यक्ष मेघश्याम सिडाम यास मुद्दे मालासह ताब्यात घेण्यात आले आहे. अवैध दारु प्रकरणी माजी नगराध्यक्षाला आठ दिवसात दोनदा पोलिसांच्या डीबी पथकाने ताब्यात घेतल्याने वरोरा शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. या कारवाईने अवैध दारु विक्रेते तूर्तास हादरले असल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)