शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

शाळा आमच्या नशिबी नाही!

By admin | Updated: June 21, 2015 01:46 IST

सोशल मिडीया आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने तरुण पिढी संपूर्ण जग कवेत घेण्याच्या प्रयत्न करीत आहे.

शाहु नारनवरे विरुर (स्टे.)सोशल मिडीया आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने तरुण पिढी संपूर्ण जग कवेत घेण्याच्या प्रयत्न करीत आहे. असे असताना, विट भट्टीवर काम करणारी व मेंढर चारणारी मुलं मात्र अद्यापही शाळा, मास्तर अन् अभ्यास या गोष्टीपासून कोसो दूर आहेत. या मुलांना अद्याप शिक्षणाचा गंध लाभला नाही.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणाची ज्योत पेटविली. त्यामुळे शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचली. मात्र पुरोगामी महाराष्ट्रात अजुनही लाखो मुलं शिक्षणापासून वंचित असल्याचे वास्तव आहे. उदरनिर्वाहासाठी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबाची संख्या महाराष्ट्रात मोठी आहे. या कुटुंबातील मुलांच्या नशिबी शिक्षण नाहीत. शेकडो कुटुंब मेंढर चारण्यासाठी सध्या चंद्रपूर जिल्ह्यात आली आहेत. शेतामध्ये ती आपली मेंढर चारतात. शेतातच त्यांचा डेरा असून तेथेच त्यांनी संसार थाटला आहे. त्यांच्यासोबत एक वर्षांपासून ते पंधरा वर्षांपर्यंतची अनेक मुलं आहेत. दसऱ्यानंतर शेतातील कामे व चारा संपल्यामुळे ही कुटुंब मेंढारासाठी व आपल्या पोटासाठी भटकंतीला निघाली. आता पावसाळा सुरू झाल्यानंतरच ती आपल्या गावी परत जाणार आहेत. त्यामुळे शिक्षणापासून त्याची मुलं कोसो दूर आहेत. यांपैकी काहींची नावे शाळेत टाकण्यात आली असली तरी दसऱ्यापासून तर परीक्षा संपेपर्यंत ती कधीच शाळेत जातच नाहीत. यापैकीच संजय मदन मारुभाऊ या १४ वर्षीय मुलाला विचारणा केली असता, शिक्षणाचे आमच्या जीवनात काहीच महत्त्व नाही. दसरा संपला की, आम्हाला बिऱ्हाड घेऊन कुटुंबासोबत निघाव लागतं. मेंढरं, बकऱ्या चाराव्या लागतात. कुटुंबाला सोडून गावात राहणार तर खाणार काय? असा प्रश्न त्याने केला. त्याच्या सारखीच अनेक मुलांची स्थिती आहेत. त्यांचे आई वडिलही त्यांना शिक्षणाचा नाही तर मेंढर, बकऱ्या चारण्याचा आग्रह धरतात.राजुरा तालुक्यात अनेक विट भट्टया आहेत. या विटाभट्टयांवर मध्यप्रदेशामधील कोरकू व इतर समाजाचेही अनेक कुटुंब राबतात. तसेच छत्तीसगढमधीलही कुटुंब विटाभट्टीवर काम करतात. त्यांची मुलेही त्यांच्या सोबत राहतात. त्यांनाही शिक्षणाचा गंध नाही. शिक्षणापासून कोसोदूर आहेत. ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, विद्यार्थ्यांनी ते प्राशन केलेच पाहिजे’ या सुविचाराप्रमाणे विकासाचे सामर्थ्य शिक्षणातच आहे. देशातील प्रत्येक व्यक्ती शिक्षित झाला पाहिजे, कुणीही शिक्षणापासून वंचित राहु नये, तसेच शिक्षणाची गंगा घराघरात पोहचली पाहिजे असा आग्रह शासनाकडूनच धरला जातो. परंतु देशातील अनेक मुलं शिक्षणापासून कोसो दूर आहेत.