वरिष्ठ वेतन श्रेणीसह शालार्थ आयडीचे प्रस्ताव निघणार निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:34 IST2021-09-16T04:34:29+5:302021-09-16T04:34:29+5:30
शैक्षणिक समस्यांबाबत आमदार अभिजित वंजारी, आ. विक्रम काळे, आ. तांबे, आ. बळीराम पाटील, आ. सगावकर यांच्यासह शिक्षक संघटनांच्या प्रमुख ...

वरिष्ठ वेतन श्रेणीसह शालार्थ आयडीचे प्रस्ताव निघणार निकाली
शैक्षणिक समस्यांबाबत आमदार अभिजित वंजारी, आ. विक्रम काळे, आ. तांबे, आ. बळीराम पाटील, आ. सगावकर यांच्यासह शिक्षक संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची पुणे येथे बैठक पार पडली. यावेळी समस्या सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले.
बैठकीत अघोषित शाळांची पात्र यादी तत्काळ शासनाकडे पाठवावी. जुनी पेन्शन योजनेची जमा झालेली संपूर्ण माहिती तत्काळ शासनास सादर करावी. वरिष्ठ व निवड श्रेणीचे ऑनलाइन प्रशिक्षण २ ऑक्टोबर २०२१ पासून प्रारंभ होणार आहे. समग्र शिक्षा अभियानातून चंद्रपूर जिल्ह्यात विद्यार्थ्यांना पुस्तक न मिळाल्याच्या तक्रारीची दखल यावेळी घेण्यात आली. संच मान्यतेसाठी विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची अट शिथिल करण्याबाबत चर्चा करण्यात आली. २० टक्के अपात्र शाळांचे प्रलंबित वेतन लवकरच केले जाईल, असे आश्वासनही देण्यात आले.
बैठकीला शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक के. पी. पाटील, जिल्हा मुख्याध्यापक असोसिएशनचे अध्यक्ष प्राचार्य नरेंद्र बोबडे, राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव प्राचार्य बारवकर, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे प्रतिनिधी प्राचार्य विलास भारसागडे, जुनी पेन्शन योजना, अघोषित शिक्षक महासंघाचे प्रतिनिधी व इतर शिक्षक संघटनेचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.