प्लाझ्मा दान करून कोरोना रुग्णांचे प्राण वाचवा :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:28 IST2021-04-25T04:28:13+5:302021-04-25T04:28:13+5:30

चंद्रपूर : कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे दिवसेंदिवस बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात मृत्यू होत ...

Save the lives of corona patients by donating plasma: | प्लाझ्मा दान करून कोरोना रुग्णांचे प्राण वाचवा :

प्लाझ्मा दान करून कोरोना रुग्णांचे प्राण वाचवा :

चंद्रपूर : कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे दिवसेंदिवस बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे. कोरोना आजारावर प्लाझ्मा थेरपीद्वारे रुग्णांवर उपचार करून त्यांना आधार दिला जात आहे. त्यामुळे आपल्या कोरोना रुग्णांचे प्राण वाचविण्याकरिता पुढे येऊन प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी शनिवारी केले.

कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी ही अनेक रुग्णांना वरदान ठरत आहे. या थेरपीत कोरोनातून बरा झालेल्या रुग्णाच्या रक्तातून काढलेल्या प्लाझ्मातील कोविडविरोधक अँटिबॉडी दुसऱ्या रुग्णाला दिल्या जातात. त्यामुळे रुग्णांना या आजारातून बाहेर काढणे काही प्रमाणात का होईना शक्य आहे. मात्र प्लाझ्मा दान करण्यासाठी कोरोनातून बरे झालेले रुग्ण समोर येत नसल्यामुळे गंभीर रुग्णांवर याद्वारे उपचार करण्याबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रश्न पडत असतो. एक प्लाझ्मा दानातून दोन रुग्ण बरे होऊ शकतात. त्यामुळे अधिकाधिक प्लाझ्मा दान करणे गरजेचे आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात काही कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी समोर येऊन प्लाझ्मा दान केला आहे.

राज्य शासनाने कोरोना उपचारासाठी रुग्णालयांना प्लाझ्मा थेरपी या उपचार पद्धतीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागानेही तयारी सुरू केली आहे. रुग्ण कोरोनाबाधित झाल्यानंतर २८ दिवस ते चार महिन्यांच्या कालावधीत कोरोनाबाधित रुग्ण बरा होऊन प्लाझ्मा दान करून इतर दोन व्यक्तींचे जीव वाचवू शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील प्लाझ्मा डोनरने प्लाझ्मा दान करून आपले कर्तव्य बजावून कोरोना रुग्णांचे प्राण वाचवावेत, असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे.

Web Title: Save the lives of corona patients by donating plasma:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.