लोकमत न्यूज नेटवर्कमूल : शिक्षणाची गोडी मनात असतानाही आर्थिक अडचणींमुळे अनेक मुलांना शिक्षणापासुन लांब राहावे लागते. अशा मुलांना शिक्षण घेता यावे, त्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी संस्कार कलश योजनेच्या वतीने मूल येथील पाच विद्यार्थ्यांचे नुकतेच पालकत्व स्वीकारण्यात आले.संस्कार कलश योजनेच्या अध्यक्ष राजश्री मुस्तीलवार, उपाध्यक्ष श्वेता चिंतावार, सचिव सीमा बुक्कावार, सहसचिव जयश्री चन्नुरवार, कोषाध्यक्ष संजिवनी वाघरे, सीमा बुक्कावार, बालविकास शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता बुटे विद्यामंदिर कॉन्व्हेन्टच्या प्राचार्य अनिता मोगरे उपस्थित होते.भूतलावरील समाजशिल प्राणी म्हणजे मानव आहे. त्यामुळे समाजाप्रती सामाजिक कर्तव्य जाणून सामाजिक उपकमातुन गरजुंची समाजसेवा करता यावी, या हेतूने कलशची स्थापना करण्यात आली. संस्कार कलश योजनेच्या वतीने बालविकास शाळेतील विद्यार्थ्यांना दीपावली गृहपाठ पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये श्रावणी भोयर, छकुली चैडेवार, तन्मय बोबाटे, स्नेहा कोडापे व ईषिका कायरकर यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च संस्कार कलश योजनेअंतर्गत केल्या जाणार आहे. भविष्यातील शैक्षणिक खर्चही ही संस्था उचलणार आहे, अशी माहिती सीमा बुक्कावार यांनी दिली. प्रास्ताविक कापसे यांनी केले. संचालन बालविकास शाळेच्या मृणाली बल्लेवार हिने केले. आभार धनश्री हेडाऊ हिने मानले. कार्यक्रमाप्रसंगी मनिषा सिरस्कर, सारिका वासेकर, राणी हेडाऊ, सपना निमगडे, रजनी भोयर, आरेवार, प्राची कुलकर्णी व संस्थेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
संस्कार कलशने स्वीकारले पाच मुलांचे पालकत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 00:25 IST
शिक्षणाची गोडी मनात असतानाही आर्थिक अडचणींमुळे अनेक मुलांना शिक्षणापासुन लांब राहावे लागते. अशा मुलांना शिक्षण घेता यावे, त्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी संस्कार कलश योजनेच्या वतीने मूल येथील पाच विद्यार्थ्यांचे नुकतेच पालकत्व स्वीकारण्यात आले.
संस्कार कलशने स्वीकारले पाच मुलांचे पालकत्व
ठळक मुद्देपे्ररणादायी उपक्रम : आरोग्यापासून तर उच्च शिक्षणापर्यंतचा खर्च उचलणार