शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

केंद्रीय पद्धतीने शाळा प्रवेशासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 5:00 AM

कोरोनाचे संकट देशावर आले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. याचा परिणाम शिक्षण विभागावरही पडला. यावर्षी प्रथमच पहिली ते नववीपर्यंत परीक्षा न होताच निकाल लागले. एवढेच नाही तर, शाळांना मार्च महिन्यामध्येच सुट्या लागल्या. सध्या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यामध्ये जिल्ह्यातील काही शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी प्रवेश घेत आहेत, तर काही शाळांमध्ये विद्यार्थीच मिळत नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देमुख्याध्यापकांना चिंता : शाळांत मर्यादेपेक्षा अतिरिक्त विद्यार्थ्यांना दिला जात आहे प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यामध्ये काही शाळा अतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रवेश देत असल्याने भविष्यात सोशल डिस्टन्सिंगअभावी धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यावर्षी केंद्रीय पद्धतीने शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवावी, जेनेकरून विद्यार्थी संख्या मर्यादित राहिल तसेच अन्य शाळांनाही विद्यार्थी मिळेल, अशी मागणी जिल्ह्यातील काही मुख्याध्यापकांनी केली आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी तसेच शिक्षक संघटनांनाही निवेदन देण्यात आले आहे.कोरोनाचे संकट देशावर आले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. याचा परिणाम शिक्षण विभागावरही पडला. यावर्षी प्रथमच पहिली ते नववीपर्यंत परीक्षा न होताच निकाल लागले. एवढेच नाही तर, शाळांना मार्च महिन्यामध्येच सुट्या लागल्या. सध्या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यामध्ये जिल्ह्यातील काही शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी प्रवेश घेत आहेत, तर काही शाळांमध्ये विद्यार्थीच मिळत नसल्याचे चित्र आहे. ज्या शाळांमध्ये अतिरित्त विद्यार्थी आहे त्या शाळांमध्ये कोरोनाच्या दहशतीत सोशल डिस्टन्सिंग पाळणे कठीण जाणार आहे. तर ज्या शाळांना विद्यार्थीच मिळाले नाही, त्या शाळांतील शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केंद्रीय पद्धतीने शाळांत प्रवेश प्रक्रिया राबविण्याची मागणी सध्या जोर धरत आहे.शाळांसाठी सोशल डिस्टन्सिंगची डोकेदुखीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पुरेशी मोकळी जागा असणे गरजेचे आहे. मात्र चंद्रपूरसह जिल्ह्यातील काही शाळांमध्ये मोकळे मैदानच नसल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थीसध्या विविध शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये वाट्टेल तेवढ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. इयत्ता पहिली,पाचवी तसेच इतर वर्गांसाठी प्रवेश देताना विद्यार्थी संख्या मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षण विभागाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.काही शाळांना विद्यार्थीच नाहीजिल्ह्यातील काही शाळा विद्यार्थ्यांना विविध आमिष दाखवित आहे. त्यामुळे या शाळांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. तर दुसरीकडे काही शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शाळा कशा चालवायच्या, असा प्रश्न सध्या संस्थाप्रमुख तसेच शिक्षकांना पडला आहे.एका बेंचवर एकच विद्यार्थी बसण्याची व्यवस्था करावीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी बसण्याची व्यवस्था वेगळी करणे आवश्यक आहे. जर प्रत्येक बाकावर एक प्रमाणे विद्यार्थी बसविले तर कोरोनाचे संकट काही प्रमाणात टाळता येणे शक्य आहे.केंद्रीय पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास सोशल डिस्टन्सिंग पाळून भविष्यातील धोके टाळता येईल. त्यामुळे शिक्षण विभागाने यावर विचार करून प्रत्येक शाळांतील तसेच वर्गातील विद्यार्थी मर्यादा ठरवून देणे गरजेचे आहे.- हरिहर भांडवलकरप्राचार्य, न्यू इंग्लिश हायस्कूल, चंद्रपूरकाही मुख्याध्यापकांनी आपल्याकडे यासंदर्भात निवेदन दिले आहे. मात्र शासनस्तरावर अजूनपर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.-संजय डोर्लीकरशिक्षणाधिकारी, माध्यमिक

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा