शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

राजुरा विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांचे भाग्य उजळणार

By admin | Updated: April 13, 2016 01:22 IST

राजुरा विधानसभा क्षेत्रातील अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय झाली होती. काही गावातील पोच रस्ते उखडल्याने

नांदाफाटा : राजुरा विधानसभा क्षेत्रातील अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय झाली होती. काही गावातील पोच रस्ते उखडल्याने दळणवळणासाठी नागरिकांना अत्यंत गैरसोयीचा सामना करावा लागत होता. याची दखल घेत राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दर्जेउन्नती सुधारण्यासाठी १५ कोटी १७ लाख ७३ हजार रूपयांचा निधी तालुक्यातील रस्त्यांसाठी मंजूर झाला आहे. तसेच खनिज विकास निधी अंतर्गत ४ कोटी २८ लाख ७८ हजार निधी प्राप्त झाला आहे. यामुळे राजुरा- गोंडपिंपरी, जिवती- कोरपना तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांचे भाग्य उजाळणार आहे. तसेच आदिवासी उपाय योजना अंतर्गत पिपर्डा- चिंचोली रस्ता कामाकरिता २५ लाख मंजूर करण्यात आले आहे. चारही तालुक्यातील चौफेर रस्त्याचे दुरुस्ती व मजबूतीकरणाच्या कामाला महत्त्व दिल्यामुळे धिडसी-निरली यासह राजुरा-कोरपनाशी जोडणाऱ्या गोवरी- कवटाळा या कोलामाईन्स क्षेत्रातील जड वाहतुकीमुळे खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीची कामे प्राध्यान्याने घेण्यात येत आहे. कोरपना येथे एक कोटीचे आदिवासीसाठी सामाजिक सभागृह, ग्रामीण भागातील दलित वस्तीसाठी सुधार योजनेंतर्गत रस्ते व मोरीचे कामे घेण्यात आले आहे. तीर्थक्षेत्र विकास कामे अंतर्गत कुसळ येथे रस्ता रुंदीकरण, पकड्डीगुड्डम रस्त्याला जोडणारा पोचमार्ग मजबूतीकरण व कुसळ येतील दुलनशाबाबा दर्गा परिसरात भोजन मंडप व रंगमंच ओटा यासाठी १५ लाखांचा निधी, तालुकाच्या ठिकाणी मुस्लिम समाजासाठी ‘शाहीखाना’ करीता मंजुरी मिळाली आहे. भाजपाचे नेते आबीद अली यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार संजय धोटे, आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांना मुस्लीम समाजाच्या कब्रस्तान संरक्षणासाठी भिंती बांधण्याऐवजी जिवंत लोकांना सामाजिक सभागृह (शाहिखाना) अशाप्रकारची कामे करण्याकरिता विनंती केली होती. याला होकार देत जिल्ह्यात तालुक्यासह सहा ठिकाणी मुस्लीम शाहीखाने मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे मुस्लीम समाजाला हक्काची जागा उपलब्ध झाली आहे. हा नावीन्यपूर्ण प्रयोग यशस्वी ठरणारा असून जिल्ह्याच्या ठिकाणी मुस्लीम समाजाला शाहिखाना, मुस्लीम लायब्ररी मंजूर करावे, यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सकारात्मक होकार दिला. यामुळे फक्त मुस्लिम समाजात आनंद पसरला आहे. (वार्ताहर)