रितेश देशमुखने जेनेलियासह केली ताडोबाची सफारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 20:38 IST2021-12-29T20:37:18+5:302021-12-29T20:38:01+5:30

Chandrapur News प्रसिद्ध सिनेअभिनेते रितेश देशमुख व पत्नी जेनेलिया डिसुजा यांनी दोन्ही मुलांसह बुधवारी सकाळी व दुपारी अशी दोनवेळा ताडोबाची सफारी केली.

Ritesh Deshmukh goes on a Tadoba safari with Genelia | रितेश देशमुखने जेनेलियासह केली ताडोबाची सफारी

रितेश देशमुखने जेनेलियासह केली ताडोबाची सफारी

चंद्रपूर : प्रसिद्ध सिनेअभिनेते रितेश देशमुख व पत्नी जेनेलिया डिसुजा यांनी दोन्ही मुलांसह बुधवारी सकाळी व दुपारी अशी दोनवेळा ताडोबाची सफारी केली. त्यांच्यासोबत त्यांचे मित्रही आले होते. रितेश देशमुख परिवाराला पहिल्या सफारी दरम्यान वाघ दिसला नाही. मात्र, त्यांच्या मित्रांनी वाघ पाहिल्याचे समजते.

दुपारच्या सफारीत त्यांना वाघ दिसला वा नाही, हे मात्र कळू शकले नाही. रितेश देशमुख हे पत्नी जेनेलिया व दोन्ही मुलांसह आपल्या मित्रांना घेऊन मंगळवारी सायंकाळी ताडोबाच्या खुटवंटा प्रवेशद्वाराच्या परिसरात असलेल्या एका रिसाॅर्टमध्ये दाखल झाले. त्यांनी बुधवारी दोन्हीवेळेची सफारी बुक केली होती. ३१ डिसेंबरपर्यंत ही मंडळी ताडोबात मुक्कामी असणार आहेत.

Web Title: Ritesh Deshmukh goes on a Tadoba safari with Genelia