शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
4
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
5
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
6
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
7
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
8
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
9
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
10
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
11
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
12
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
13
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
14
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
15
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
16
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
17
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
18
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
19
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 

भाव वाढल्याने सोयाबीनचा पेरा वाढला, मात्र मिलीबगच्या संकटाने शेतकरी धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:34 IST

सोयाबीनवर पडणाऱ्या किडींचे पुढील सहा गटांमध्ये वर्गीकरण केले जाते. त्यामध्ये बियाणे व रोपे खाणाऱ्या किडी, खोड पोखरणाऱ्या किडी, पाने ...

सोयाबीनवर पडणाऱ्या किडींचे पुढील सहा गटांमध्ये वर्गीकरण केले जाते. त्यामध्ये बियाणे व रोपे खाणाऱ्या किडी, खोड पोखरणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या किडी, रस शोषणाऱ्या किडी, फुले व शेंगा खाणाऱ्या किडी आणि साठवलेल्या बियाण्यातील किडींचा समावेश होतो. यापैकी सोयाबीनवर मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या व नुकसानकारक असणाऱ्या खोडमाशी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, पाने पोखरणारी अळी, चक्री भुंगे, उंट अळी, केसाळ अळी, हुमणी तसेच तुडतुडे, फुलकिडे व पांढरी माशी इत्यादी किडींची प्रादुर्भाव दिसून येत आहे. सोयाबीनला शेंगा लागण्याची स्थिती असतानाच मिलीबग (पिठ्या ढेकूण) रोग वाढू लागला. त्यामुळे मिलीबग (पिठ्या ढेकूण) या किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जात आहे.

काय आहे मिलीबग ?

मिलीबग कीड कपाशीचे खोड, पानाच्या देठाजवळ पुंजक्यात राहते. ही कीड झाडातील रस शोषण करते. कीड चिकट द्राव सोडते, त्यामुळे पाने काळपट होतात. जास्त प्रादुर्भाव झाला तर पाने व फांद्या वाळून जातात.

नियंत्रणाचे उपाय

जैविक कीडनाशकाचा वापर करताना व्हर्टिसिलियम लेकॅनी ४० ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जेथे किडीचा प्रादुर्भाव आहे तेथेच याची फवारणी करावी. फवारणीच्या वेळी शेतकऱ्यांनी स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्यावी.

मिलीबग रोखण्यासाठी ही घ्या काळजी

रासायनिक कीडनाशकांचा वापर करताना क्लोरपायरिफॉस (२० टक्के) ३० मि.लि. किंवा बुप्रोफ्रेझीन २० मि.लि. प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ही फवारणी प्रादुर्भावित पाने, झाडाचे खोड तसेच जमिनीवरदेखील करावी.

कोट

पेरणीवर लावलेला पैसा निघतो की नाही ?

माझी शेती बल्लारपूर तालुक्यात आहे. सोयाबीन पेरणीपासूनच यंदा हवामान व पाऊस पोषक आहे. मात्र, काही दिवसांपासून किडीचा प्रादुर्भाव सुरू झाला. काही दिवसांपूर्वीच फवारणी केली आहे. फवारणीचा फायदा झाला नाही तर लागवडीचा खर्च तरी निघण्याची शक्यता कमीच आहे.

-रामचंद्र येरणे, शेतकरी भिवापूर वॉर्ड, चंद्रपूर

कोट

कपाशीची स्थिती चांगली आहे. परंतु सोयाबीन पिकावर मिलीबगने आक्रमण केले. झाडाला शेंगा लागत आहेत. त्यातच हा रोग आल्याने चिंता वाढली. कृषी विभागाच्या पथकाने शेतीची पाहणी करून प्रतिबंधात्मक फवारणीची माहिती दिली. त्यानुसार फवारणी सुरू केली आहे. माझ्या शेतीजवळचे अन्य शेतकरीही फवारणी करीत आहेत.

- गंगाधर मालधुरे, शेतकरी, बल्लारपूर