कापूस घेऊन जाणारा ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 23:46 IST2017-12-09T23:45:47+5:302017-12-09T23:46:44+5:30

तेलंगणातून राजुरा मार्गे कापूस घेऊन जाणारा ट्रक गडचांदूरजवळच्या हरदोना गावाजवळ उलटला. या अपघातात ट्रकचालक जखमी झाल्याची माहिती असून ही घटना शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली.

Reverse the truck carrying cotton | कापूस घेऊन जाणारा ट्रक उलटला

कापूस घेऊन जाणारा ट्रक उलटला

लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : तेलंगणातून राजुरा मार्गे कापूस घेऊन जाणारा ट्रक गडचांदूरजवळच्या हरदोना गावाजवळ उलटला. या अपघातात ट्रकचालक जखमी झाल्याची माहिती असून ही घटना शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली.
तेलंगणातून कापूस घेऊन राजुरामार्गे वनसडीकडे कापूस घेऊन जाणाऱ्या एपी१०-२८४४ या क्रमांकाच्या ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात ट्रक चालक जखमी झाल्याची माहिती असून त्याला चंद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
मात्र चालकाचे नाव कळू शकले नाही. कापूस घेऊन जाणारे तेलगू भाषिक असल्याने हा ट्रक कुठून आला व कापूस कोणत्या गावातील शेतकºयाचा आहे, याची पुरेपूर माहिती मिळू शकली नाही. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून कापसाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

Web Title: Reverse the truck carrying cotton

टॅग्स :Accidentअपघात