शहरं
Join us  
Trending Stories
1
बेपर्वाईचे ९ बळी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, वादळी वारा, अवकाळी पावसाचा तडाखा
2
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
3
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
4
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
5
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
6
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
7
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
8
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
9
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
10
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
11
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
12
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
13
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
15
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
16
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
17
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
18
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
19
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
20
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!

कोर्टीमक्ता येथे होणार राखीव बटालियन ४ स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 12:44 AM

राज्याचे अर्थ, वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे बल्लारपूर तालुक्यातील कोर्टीमक्ता येथे भारत राखीव बटालियन क्रमांक ४ स्थापन करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार : युवकांना नोकरीची संधी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्याचे अर्थ, वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे बल्लारपूर तालुक्यातील कोर्टीमक्ता येथे भारत राखीव बटालियन क्रमांक ४ स्थापन करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.राज्य शासनाला कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित कर्तव्ये वेळेवर व परिणामकारकरित्या पार पाडता यावी तसेच इतर राज्यांनाही मदत करता करण्याच्या हेतूने केंद्रीय भारत राखीव बटालियनची स्थापना करण्यात आली आहे. सदर बटालियन प्रभावपणे कार्यरत असून नक्षलविरोधी अभियानामध्ये दीर्घ आणि लघु कालावधीत गस्त, नाकाबंदी, आठवडी बाजार बंदोबस्त तसेच पोलीस ठाण्यांना संरक्षण आदी बाबी हाताळत आहे. या बटालियन व्यतिरिक्त आणखी दोन बटालियन मंजूर केल्यास नक्षलग्रस्त कारवाया तसेच कायदा व सुव्यवस्था हाताळणे सुकर होईल, या दृष्टीने राज्यासाठी दोन नविन भारत राखीव बटालियन मंजूर केल्याचे केंद्र्र शासनाने कळविले आहे. कोर्टीमक्ता येथे भारत राखीव बटालियन क्रमांक ४ स्थापन करण्याच्या प्रस्तावाला बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता प्रदान केली आहे. भारत राखीव बटालियनच्या पदांची भरती करताना नक्षलग्रस्त भागातील उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेत प्रचलित नियमानुसार स्थानिकांना प्राधान्य देताना वय आणि शैक्षणिक अटी शिथील करण्यात येणार आहे. भारत राखीव बटालियनमध्ये गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या नक्षलप्रभावित जिल्हयामधील उमेदवारांमधूनच पदभरती होणार आहे. ही भरती प्रक्रिया दोन वर्षांत पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. नक्षलग्रस्त भागातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्याच्या प्रक्रियेत हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. या निर्णयामुळे बेरोजगारांना नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहे.१ हजार ३८४ पदांची निर्मितीसदर बटालियन स्थापन करण्यास मान्यता व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. गडचिरोली, चंद्र्रपूर आणि गोंदिया येथील उमेदवारांमधून होणार पदभरती सदर भारत राखीव बटालियनसाठी १ हजार ३८४ पदे निर्माण करण्यात आली. याकरिता राज्य मंत्रिमंडळाने आवर्ती व अनावर्ती खर्चाला खर्चाला मान्यता दिली. पहिल्या टप्प्यात एकूण आवश्यक पदाच्या एक तृतीयांश पदे निर्माण केल्या जाणार आहे.जिल्ह्यात नाविण्यपूर्ण योजना व विकासकामेपालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी आणला. योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्याने शेकडो कामे पूर्णत्वास आली आहेत. पायाभूत सुविधांची निर्मिती करताना राज्यात दखलपात्र ठरतील अशा नाविण्यपूर्ण योजनांकडे त्यांचे विशेष लक्ष आहे. याचाच परिणाम म्हणून संस्थात्मक कामांची संख्या वाढली. उद्दिष्टानुसार प्रशासनाकडून कामे पूर्ण करून घेत असल्यानेच हे शक्य होत आहे.