शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
2
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
3
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
4
मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर
5
धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
6
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
7
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
8
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
9
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”
10
ऑटो जगतात खळबळ! निस्सान भारतासह जगभरातील प्रकल्प बंद करण्याच्या तयारीत; पैकी जपानमधील दोन... 
11
भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला कांदिवलीच्या नागरिकांचा सलाम; काढली 'तिरंगा पदयात्रा'
12
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
13
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
14
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
15
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
16
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
17
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
18
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
19
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
20
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी

तब्बल सहा तास चालले वाघाचे रेस्क्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:01 IST

या वाघास ताब्यात कसे घ्यायचे, यावर वनविभागाच्या उपस्थित अधिकाऱ्यांनी बरेच विचारविनिमय केले. पण कोणताच मार्ग दिसत नव्हता. वाघ बघायला आलेले लोकही हटत नव्हते. निदान जाळ्यात येईल म्हणून वाघ ज्या घरात बसला होता, त्या घराभोवती जाळे टाकण्यात आले. पण वाघ बाहेर पडण्याचे नाव घेत नव्हता.

ठळक मुद्देवाघाची रवानगी गोरेवाड्यात : वाघ जेरबंद होताच नागरिकांचा जीव भांड्यात

घनश्याम नवघडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : तालुक्यातील बाम्हणी येथे भरदिवसा घरात घुसलेल्या त्या वाघाला ताब्यात घेण्यासाठी तब्बल सहा तास शिकस्त करावी लागली. शेवटी रात्री १० वाजताच्या सुमारास त्याला बेशुद्ध करूनच जेरबंद करण्यात आले.रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास हा वाघ घरात घुसल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. घरात घुसलेल्या या वाघाचे फोटो काही व्यक्तींनी सोशल मीडियावर व्हायरल केले आणि बघता बघता ही माहिती पंचक्रोशीत पोहचली. आणि कळायच्या आत या वाघाला बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली. दरम्यान वनविभागालाही ही माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी महेश गायकवाड ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. पोलीसही आले. गर्दीला पांगविण्याचे बरेच प्रयत्न केले. पण ते निष्फळ ठरले. घरात दडून असलेल्या या वाघाने एकदा बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. पण समोर असलेल्या लोकांच्या गर्दीमुळे परत माघारी वळला.या वाघास ताब्यात कसे घ्यायचे, यावर वनविभागाच्या उपस्थित अधिकाऱ्यांनी बरेच विचारविनिमय केले. पण कोणताच मार्ग दिसत नव्हता. वाघ बघायला आलेले लोकही हटत नव्हते. निदान जाळ्यात येईल म्हणून वाघ ज्या घरात बसला होता, त्या घराभोवती जाळे टाकण्यात आले. पण वाघ बाहेर पडण्याचे नाव घेत नव्हता. शेवटी सदर वाघास बेशुद्ध करून जेरबंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसे वरिष्ठांना कळविण्यात आले व वरिष्ठांकडून मदत मागण्यात आली. वरिष्ठांच्या सूचनेनुसार या वाघाला बेशुद्ध करण्यासाठी रात्री ७.३० वाजताच्या दरम्यान ट्रँक्यूलायझर टीम ताडोबा येथून निघाली व ९.३० वाजता बाम्हणी येथे पोहचली. रात्री १० वाजता या वाघास बेशुद्धीचे इंजेक्शन देण्यात आले. १५ मिनिटांत वाघ बेशुद्ध झाल्यानंतर त्याला जेरबंद करण्यात आले. दरम्यान रविवारी रात्री उपवन संरक्षक कुलराज सिंह, सहायक उपवन संरक्षक आर.एम. वाकडे हेही घटनास्थळी हजर झाले आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसारच त्या वाघाचे रेस्क्यू करण्यात आले. नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात वाघाला सोडण्यात आले.तालुक्यात वाघ आहेत किती ?१९ जून रोजीच नागभीडलगत असलेल्या तुकूम येथील एका व्यक्तीस वाघाने ठार केले होते. या घटनेच्या वृत्ताची शाई वाळत नाही, तोच रविवारी वाघाने बाम्हणी येथे चक्क घरात ठाण मांडले. एवढेच नाही तर तालुक्यातील पाहार्णी, गिरगाव, कचेपार, बाळापूर, मिंडाळा, घोडाझरी आदी परिसरात वाघाबद्दलच्या चर्चा नेहमी कानावर येत असतात. यावरून नागभीड तालुक्यात किती वाघांचे वास्तव्य आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या शेतीचा हंगाम जोरात सुरू आहे. अशा परिस्थितीत वाघांच्या अशा घटना घडत गेल्या तर त्या शेतकºयांसाठी अडचणीच्या ठरणार आहेत.‘तो’ वाघ नाही वाघीणबाम्हणी येथील श्रीकांत देशमुख यांच्या घरात ठाण मांडलेली वाघीण होती. तिचे वय झाले होते आणि तिच्यात अशक्तपणा दिसत होता. म्हणून तिच्यावर अधिक उपचार व्हावेत, यासाठी नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात हलविण्याचा निर्णय वनविभागाने घेतला. 

टॅग्स :forestजंगल