संपावरील वन कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्याला निवेदन
By Admin | Updated: September 9, 2014 00:17 IST2014-09-09T00:17:04+5:302014-09-09T00:17:04+5:30
वनपाल, वनरक्षक आणि वनमजूर या वनकामगारांच्या संपात येथील वाहतूक व विपणन विभागातील १७५ कर्मचारी संपावर आहेत. हे कर्मचारी येथील कास्ट्राईब वन कर्मचारी संघटनेचे सदस्य असून

संपावरील वन कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्याला निवेदन
बल्लारपूर : वनपाल, वनरक्षक आणि वनमजूर या वनकामगारांच्या संपात येथील वाहतूक व विपणन विभागातील १७५ कर्मचारी संपावर आहेत. हे कर्मचारी येथील कास्ट्राईब वन कर्मचारी संघटनेचे सदस्य असून संघटनेने संपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे वाहतूक आणि विपणनच्या कामावर परिणाम पडला असून वनपालांच्या मागण्या सोडविण्याची मागणी संघटनेने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.
वनपाल, वनरक्षक, वनमजूर यांची वेतनश्रेणी सुधारणा तथा विविध सेवाविषयक समस्या शासनाकडे प्रलंबीत आहेत. मागील २५ वर्षांपासून या समस्यांकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे वनपाल, वनरक्षक आणि वनमजूर यांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. या दरम्यान कास्ट्राईब वन कर्मचारी संघटनेच्या वतीने संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या व समस्यांबाबतचे निवेदन बल्लारशाह वन वाहतूक व विपणनचे वनसंरक्षक अशोक खडसे यांना दिले. शासनाने मागण्यांकडे लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा दिला आहे. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष हरडे, प्रवीम विरूटकर, आर. एस. चहांदे, कारेकर, कोकुलवार, श्रीरामे, शंकरवार, एस. डी. राऊत, करमनकर, सारनाकर, मडावी, डोंगरे, रामटेके आदींची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)