शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

घाणीने माखलेल्या एसटी बसगाड्यांची आता नियमित स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:34 AM

गाव तेथे एसटी, एसटीचा प्रवास-सुखकर प्रवास म्हणत ‘प्रवाश्यांच्या सेवेसाठी’ ब्रिद घेऊन जनतेच्या सेवेत असलेल्या एसटी महामंडळाला सध्या प्रवासी मिळानासे झाले आहेत.

ठळक मुद्देएसटी महामंडळाचा उपक्रम : खर्ऱ्याच्या पिचकाऱ्या धुवून काढण्याची अशीही ‘गांधीगिरी’

परिमल डोहणे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गाव तेथे एसटी, एसटीचा प्रवास-सुखकर प्रवास म्हणत ‘प्रवाश्यांच्या सेवेसाठी’ ब्रिद घेऊन जनतेच्या सेवेत असलेल्या एसटी महामंडळाला सध्या प्रवासी मिळानासे झाले आहेत. प्रवासी संख्या वाढावी, म्हणून विविध उपययोजनाही केल्या जात आहेत. मात्र भंगार बसगाड्या व बसमधील खर्ऱ्याच्या पिचकाऱ्या, अस्वच्छता यामुुळे अनेक प्रवाशी एसटीचा प्रवास टाळतात. त्यामुळे स्वच्छतेसाठी परिवहन महामंडळाने पुढाकार घेतला असून घाणीने माखलेल्या बसगाड्यांची नियमित स्वच्छता केली जात आहे.राज्य महापरिवहन महामंडळातर्फे संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानातंर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी परिवहन महामंडळाने एका खासगी कंपनीला स्वच्छतेचे कंत्राट दिले असून या कंपनीच्या मार्फत महामंडळाच्या बसगाड्यांची व परिसराची नियमित स्वच्छता करण्यात येत आहे. महामंडाळाच्या बसगाड्या म्हणजे शासकीय मालमत्ता असा समज जनसामान्यात असल्याने कोणतीही पर्वा न करता अनेक प्रवासी बसगाडीत धुम्रपान करतात. खर्ऱ्याच्या पिचकाऱ्या मारतात. तर काही मुंगफल्ली व इतर खाद्यपदार्थाच्या पिशव्या सीटखालीच टाकून देतात.या अस्वच्छतेमुळेच अनेकांना प्रवासामध्ये उलटी येत असते. त्यामुळे महामंडळाने बसची स्वच्छता करण्याची मोहीम हाती घेतली आहे. चंद्रपूर आगारातील ९६ बसगाड्या व इतर आगारातून येणाऱ्या बसगाड्यांची नियमीत साफसफाई तसेच पाणी मारुन स्वच्छता केली जात आहे. यात चंद्रपूर आगारामध्ये येणाऱ्या दररोज १०० च्या जवळपास बसगाड्या स्वच्छ होत असून ४० बसगाड्या पाण्याने धुऊन काढण्यात येत आहेत. त्यामुळे महामंडाळाच्या बसगाड्यातील अस्वच्छता दूर होत आहे.प्रवाशांच्या सहकार्याची गरजपरिवहन महामंडळाच्या उपक्रमातून बसची दररोज स्वच्छता केली जात आहे. मात्र त्यानंतरही काही प्रवासी बसमध्येच खर्रा खाऊन धुम्रपान करतात. त्यामुळे बसगाड्या पुन्हा खराब होताना दिसून येत आहेत. त्यासाठी प्रवाशांनी सहकार्य करण्याची गरज असल्याने एसटी महामंडळाच्या चालक-वाहकाचे म्हणणे आहे.