शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

राजीव गांधी सचिवालय बांधकामात लाखोंचा अपहार ?

By admin | Updated: October 26, 2014 22:37 IST

ग्रामस्तरावर विकासाची परिपूर्ण जबाबदारी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडून येणारा लोकप्रतिनिधी हा जनता व विकास यामधील दुवा असतो. मात्र स्वस्वार्थापोटी विकास निधी जनकल्याणासाठी

गोंडपिपरी : ग्रामस्तरावर विकासाची परिपूर्ण जबाबदारी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडून येणारा लोकप्रतिनिधी हा जनता व विकास यामधील दुवा असतो. मात्र स्वस्वार्थापोटी विकास निधी जनकल्याणासाठी न वापरता त्याची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रकार तालुक्यात सुरू असून जि.प. अंतर्गत मंजूर लाखो रुपयांचे राजीव गांधी ग्राम सचिवालये बांधकाम तालुक्यात थंडबस्त्यात असल्याने मोठा अपहार झाला की काय, अशी शक्यता नागरिकांकडून वर्तविण्यात येत आहे.९८ गावाचा तालुका असलेल्या व आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त तसेच अतिदुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंडपिपरी तालुक्यात एकूण ५१ ग्रामपंचायती आहेत. शासन स्तरावरुन विविध जनकल्याणकारी योजनांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी ग्रा.पं. स्तरावर देण्यात येतो. मात्र गेल्या एक ते दोन वर्षापूर्वी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी सामाजिक योजना, पर्यावरण समृद्धी, लोककल्याण योजना या महत्वपूर्ण योजनांकडे विशेष लक्ष न देता केवळ बांधकाम व कंत्राट याकडे अधिक लक्ष घातल्याची माहिती आहे. अशातच तालुक्यात पदाधिकारीच कंत्राटदार हा फॉर्म्यूलाही मागील बऱ्याच वर्षापासून तालुक्यात सुरू आहे. याच दरम्यान तालुक्यातील काही ग्रा.पं.च्या पदाधिकाऱ्यांनी कागदी पाठपुरावा व राजकीय व जनाचा वापर करुन लक्षावधींची विकास कामे खेचून तर आणली. मात्र विकास कामांचे कंत्राट स्वत:कडेच राखल्याने कामांचा गुणवत्ता दर्जा मात्र खालावलेल्या पद्धतीचा असल्याचे अविधी लोटताच नागरिकांच्या लक्षात येत असल्याची माहिती आहे. शासनस्तरावरुन ग्रामपंचायत भवन उभारणी करीता राजीव गांधी ग्रामसचिवालय योजनेंतर्गत लक्षावधी रुपयांचा निधी मिळतो. यासाठीच तालुक्यातील बहुतांश ग्रा.पं.नी सचिवालय बांधकामास मंजुरीसह निधीही मिळविला. मात्र गेल्या दीड ते दोन वर्षापूर्वी अनेक ग्रा.पं.नी सचिवाल्यांचे बांधकाम सुरू केले. परंतु आजवर बांधकाम प्रगतिपथावर असल्याचे दाखवून काहींनी बांधकाम पूर्ण होण्या अगोदरच पूर्ण निधीची उचल केल्याचीही माहिती नागरिकांकडून मिळाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून राजीव गांधी ग्राम सचिवालयांचे बांधकाम अपूर्ण असून बांधकाम निधीत मोठा अपहार झाल्याची शक्यता नागरिकांकडून वर्तविली जात आहे. तरीही वरिष्ठांनी सदर गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. (तालुका प्रतिनिधी)