शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

राजेश पोटावीला फसविले

By admin | Updated: December 18, 2015 01:44 IST

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ११३ बटालियनने धानोरा तालुक्यातील मरकेगाव येथील हरीष उर्फ राजेश उर्फ गोलू पोटावी याला १५ डिसेंबर रोजी अटक केली होती.

मरकेगावच्या ग्रामस्थांचा आरोप : कोणत्याही गुन्ह्यात तो सहभाग नाहीगडचिरोली : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ११३ बटालियनने धानोरा तालुक्यातील मरकेगाव येथील हरीष उर्फ राजेश उर्फ गोलू पोटावी याला १५ डिसेंबर रोजी अटक केली होती. या घटनेनंतर गुरूवारी मरकेगाव येथील नागरिकांनी लोकमत प्रतिनिधीला भेटून या प्रकरणाची परिस्थिती समजावून सांगितली. राजेश सावजी पोटावी रा. पोटावी टोला (मरकेगाव) हा कर्करोगी असून तो साधा सरळ युवक आहे. यापूर्वी कोणत्याही नक्षल घटनेमध्ये त्याचा सहभाग नव्हता. दोन दिवस राजेशला सावरगाव पोलीस मदत केंद्रात ठेवून त्याच्याविरूध्द खोटे पुरावे निर्माण करण्यात आले. मरकेगावजवळील पोटावी टोला येथील पोटावी परिवारातीलच राजेशचा काका हरीष पोटावी व मोठा भाऊ गोलू हा नक्षल दलममध्ये कार्यरत आहे. मात्र राजेश नक्षली नसतांनाही चामोर्शी एलओसी दलम सदस्यास अटक केल्याचे वर्तमानपत्रातून पोलिसांना कळाले. यात राजेश पोटावीचे छायाचित्रही आहे. राजेशचा कोणत्याही गुन्ह्यात सहभाग नसताना त्याच्याविरूध्द खोटे पुरावे निर्माण करण्यात आले आहे. याबाबत सावरगाव पोलिसांनी राजेशची सुटका करावी, अशी मागणी येथील नागरिक बारसाय पोथा, पंडिराम उसेंडी, देवाजी नैताम, बुधेसिंग नैताम, मनकूराम पुडो, देवसाय उसेंडी, मनुराम धुर्वे, परशु पोटावी, कमलेश पोया, सावजी पोटावी, मोतीराम पोटावी, मनकेर उसेंडी या ग्रामस्थांनी लोकमतशी बोलताना केली आहे. (प्रतिनिधी)