शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 23:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : शेतकऱ्यांना सिंचन विषयक सुविधा उपलब्ध करत त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. ...

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : चिचाळा येथे पाईपलाईनद्वारे सिंचन सुविधा उपलब्ध करण्याच्या कामाचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांना सिंचन विषयक सुविधा उपलब्ध करत त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत चिचाळा व लगतच्या गावांमध्ये पाईपलाईनद्वारे सिंचनाची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करण्यासाठी २३ कोटी रूपये निधी आपण उपलब्ध केला आहे. बल्लारपूर तालुक्यात दहा गावांना सिंचनाच्या दृष्टीने वरदान ठरणारी पळसगाव-आमडी उपसा जलसिंचन योजना, चिचडोह बॅरेज अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील २८ व गडचिरोली जिल्ह्यातील ४३ अशा एकूण ७१ गावांना पिण्याचे पाणी व ११ हजार ५१० हेक्टर सिंचन क्षेत्रास लाभ मिळणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.मूल तालुक्यातील चिचाळा येथे पाईपलाईनद्वारे सिंचनाची सुविधा उपलब्ध करण्याच्या कामाच्या भूमीपूजन सोहळयानिमित्त आयोजित जाहीर सभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा नेते प्रमोद कडू, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, पंचायत समिती सभापती पूजा डोहणे, उपसभापती चंदू मारगोनवार, जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज अवताडे, मुख्य अभियंता स्वामी, अधिक्षक अभियंता वेमूलकोंडा, कार्यकारी अभियंता राजेश सोनोने आदींची उपस्थिती होती.यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, विविध विकासकामे, पायाभूत सुविधा आदींसह शेतकºयांना सिंचन विषयक सुविधा उपलब्ध करून देण्यावर आपण नेहमीच भर दिला आहे. चांदा ते बांदा विशेष कार्यक्रमांतर्गत मूल तालुक्यातील चिचाळा व नजिकच्या सहा गावांना शेतीसाठी सिंचन सुविधा पुरविण्याकरिता २३ कोटी ४७ लक्ष ५४ हजार रू. निधी मंजूर करण्यात आला असून सदर परिसरातील शेतकºयांना या माध्यमातुन मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. जून २०१९ पर्यंत योजना पूर्ण करण्याचे आदेश आपण दिले आहेत. अजयपूर येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्र हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत असल्याचे ते म्हणाले.पाच हजार शेतकºयांसाठी सधन शेतकरी प्रकल्पनलेश्वर मध्यम प्रकल्पाच्या मुख्य कालव्याचे अस्तरीकरणाचे काम, भसबोरण लघु प्रकल्पाच्या विशेष दुरूस्तीचे काम, पिपरी दीक्षित लघु प्रकल्पाच्या विशेष दुरूस्तीचे काम, जानाळा लघु प्रकल्पाची विशेष दुरूस्ती, राजोली येथील माजी मालगुजारी तलावाची विशेष दुरूस्ती, मौलझरी लघु प्रकल्पाची विशेष दुरूस्ती, मूल येथील माजी मालगुजारी तलावाच्या कालाडोह पूरक कालव्याच्या विशेष दुरूस्तीचे काम, जामखुर्द उपसा सिंचन योजनेचे विशेष दुरूस्तीची कामे मंजूर करत या सर्व विशेष दुरूस्तीच्या कामांसाठी सुमारे २५ कोटी रूपयांचा निधी मंजूर करविला आहे. विशेष बाब या सदराखाली मूल आणि पोंभुर्णा या तालुक्यातील शेतकºयांसाठी सिंचन विहिरी आपण मंजूर करविल्या आहेत. टाटा ट्रस्टच्या सहकार्याने पाच हजार शेतकºयांसाठी सधन शेतकरी प्रकल्प आपण प्रायोगिक तत्वावर राबवित आहोत.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारFarmerशेतकरी