शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

अकाली पावसामुळे धानपीक संकटात

By admin | Updated: October 26, 2014 22:37 IST

तालुक्यात काल शनिवारपासून झालेल्या अकाली पावसामुळे व ढगाळी वातावरणाने धानपिके संकटात आली आहे. बहुतांश धान पिकांना घाटे अळीचा प्रादुर्भाव जाणवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ब्रह्मपुरी : तालुक्यात काल शनिवारपासून झालेल्या अकाली पावसामुळे व ढगाळी वातावरणाने धानपिके संकटात आली आहे. बहुतांश धान पिकांना घाटे अळीचा प्रादुर्भाव जाणवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.हंगामाला सुरुवातीला पावसाने हुलकावणी दिली. शेतीचे काम आॅगस्ट महिन्यापर्यंत खोळंबली होेती. काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करुन पोळ्याच्या सणानंतरही रोवणीची कामे केली. दरम्यानच्या कालखंडात धानपिके संपूर्णत: शेतकऱ्यांच्या हाती आल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु कालपासून हलकासा पाऊस व ढगाळ वातावरणाने जड जातीच्या धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणीला आलेले पिक पावसामुळे लोंबलेले आहे. ढगाळ वातावरणामुळे घाटे अळीने पिकांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. शेतकरी हाती आलेल्या पिकांकडे पाहून चिंताग्रस्त असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांसमोर सध्या फार मोठे प्रश्न आहेत. हाती आलेले पीक धोक्यात आले तर जनावरांचे व्यवस्थापन नीट होत नाही. जनावरांच्या चाऱ्याच्या किमती वाढल्यामुळे उत्पादन खर्च वाढणे आवश्यक होते. पण उत्पादनच हळूहळू धोक्यात आले आहे. वर्षभराचे आर्थिक नियोजनही पूर्णपणे ढासळून कर्जाचा डोंगर निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांवर आलेली दिसून येत आहे. तालुक्यातील खरीप हंगाम अशा वेगळ्या दिशेने वाटचाल करीत असल्याने येणाऱ्या रब्बी पिकांबद्दल पेरणीच्या संदर्भात शेतकरी धास्तावलेला आहे. फवारणी मारुन घाटेअळी दूर करता येऊ शकते, असेही म्हणता येत नाही. कारण धानाचा अंतिम टप्पा असल्याने फवारणीकरण्यासाठी अनुकूल वेळ नसल्याने घाटेअळीवर योग्य बंदोबस्त या वेळेस करता येत नाही. अऱ्हेर नवरगाव, गांगलवाडी, मेंडकी, एकरा, मुडझा आदी परिसरातील हजारो हेक्टरवरील पिकांवर या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. (प्रतिनिधी)