पावसाने दुबार पेरणीचे संकट टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 00:19 IST2018-06-29T00:18:21+5:302018-06-29T00:19:09+5:30

गेल्या १० ते १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले होते. मात्र बुधवारी व गुरूवारी जिल्हाभर पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. बुधवारी जिल्ह्यात २५.५७ च्या सरासरीने ३८३.६ मिमी पावसाची नोंद झाली.

Rains sinking sowing | पावसाने दुबार पेरणीचे संकट टळले

पावसाने दुबार पेरणीचे संकट टळले

ठळक मुद्देशेतकरी सुखावला : जिल्हाभर पावसाची रिमझिम

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गेल्या १० ते १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले होते. मात्र बुधवारी व गुरूवारी जिल्हाभर पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. बुधवारी जिल्ह्यात २५.५७ च्या सरासरीने ३८३.६ मिमी पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यात १२ ते १३ जूनला पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी धान पऱ्हे व कापूस बियाण्यांची पेरणी केली. मात्र त्यानंतर पाऊस गायब झाल्याने बियाणे अंकुरण्याआधीच करपण्याचा धोका निर्माण झाला होता. परिणामी अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. मात्र दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असल्याने शेतकरी सुखावला आहे. तर उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
धान पºहे, कापूस पिकाला जीवदान
येनबोडी : बल्लारपूर तालुक्यात कळमना, आमडी, पळसगाव, किन्ही, इटोली, मानोरा आदी गावातील शेतकºयांनाी धान पऱ्हे व कापूस पिकाची लागवड केली होती. मात्र पंधरा दिवसांपासून पाऊस बेपत्ता होता. धान पऱ्हे पाण्याविना करपण्यावर होते. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट होते. मात्र दोन दिवसांपासून रिमझीम पाऊस सुरू असल्याने धानपऱ्हे व कापूस पिकाला जिवदान मिळाले आहे.
शेतकऱ्यांची चिंता दूर
नागभीड : बुधवारपासून रिमझिम पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे. नागभीड तालुक्यात धानाचे पीक घेतल्या जाते. बहुतांश शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले होते. मात्र पावसाच्या दडीने शेतकऱ्यांत चिंता पसरली होती. दुबार पेरणीच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त असताना बुधवारपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
१५ दिवसानंतर पाऊस
मारोडा : या परिसरात बुधवारी रात्री व गुरुवारी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांत आनंद पसरला आहे. सुरुवातीला आलेल्या पावसाने शेतकऱ्यांनी महागडे बियाणे पेरले. परंतु गेली १५ दिवस पाऊस पडला नाही. त्यामुळे धान पऱ्हे करपू लागले होते. परंतु, बुधवार रात्री व गुरुवारला आलेल्या पावसाने धान पऱ्ह्यांना संजीवनी मिळाली आहे.

Web Title: Rains sinking sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.