शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे गेट ठरतोयं विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी

By admin | Updated: March 2, 2015 01:08 IST

राजुरा शहरातील आसिफाबाद मार्गावरील केवळ सिमेंट कंपनीच्या वाहुकीसाठी तयार झालेले रेल्वे गेट विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

राजुरा: राजुरा शहरातील आसिफाबाद मार्गावरील केवळ सिमेंट कंपनीच्या वाहुकीसाठी तयार झालेले रेल्वे गेट विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. दिवसातून १० ते १५ वेळा हे गेट अर्धा-अर्धा तास बंद राहत असते. या गेटच्या पुढे अनेक शाळा, महाविद्यालये असल्याने विद्यार्थ्यांना गेटवरून गेल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे येथे उड्डाणपुल निर्माण करण्याची मागणी होत आहे.येथील शिवाजी महाविद्यालय, पीएम डीएड कॉलेज, सिद्धार्थ तेलगू विद्यालय, आदर्श मराठी प्राथमिक शाळा, न्यू एका इंग्लिश कॉन्व्हेंट, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्र माध्यमिक विद्यालय, नगर परिषद प्राथमिक शाळा या गेटच्या पलिकेकडे आहे. त्यामुळे या गेटवरून दररोज चार ते पाच हजार विद्यार्थी येणे-जाणे करतात. मात्र, सकाळी नेमके शाळा भरतानाच गेट बंद असतो तर शाळा, महाविद्यालय सुटतांनाही पुन्हा गेट बंद असतो. गेट एकीकडे आहे तर रेल्वे स्टेशन दुसरी कडे आहे. मात्र, रेल्वेच्या नियोजन शुन्य कारभारामुळे विद्यार्थी व पालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात तर विद्यार्थी भिजत गेट उघडण्याची उभे राहून प्रतीक्षा करीत असतात. राजुरा येथील रेल्वे गेट केवळ सिमेंट कंपन्याचे लाड पुरविण्यासाठी असून या गेट व रेल्वे ट्रॅकमुळे सामान्य मानसाला फटका बसत आहे. या सर्व कंपन्या वर्षाला २०० करोडच्यावर नफा कमवितात. मग येथे उडान पुल या कंपन्यांनी बांधून का दिला नाही. परंतु, अशी मागणी करणारे लोकप्रतिनिधी नाही. या ठिकाणी मागील अनेक वर्षापासून हजारो नागरिक त्रास सहन करीत आहे. परंतु, एक आंदोलन करण्याची धमक कुणामध्ये दिसत नाही, ही मोठी शोंकातीका आहे. केवळ निवडणुका आल्या की मतदार आठवतात. निवडणूक संपली सर्व दुर्लक्ष. त्यामुळे येथील रेल्व गेटवरुन उड्डान पूल निर्माण करण्याची मागणी नागरिक व विद्यार्थ्यांनी केली आहे (शहर प्रतिनिधी)