दारुविक्रेत्यांविरोधात धाडसत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 05:00 AM2020-07-28T05:00:00+5:302020-07-28T05:00:35+5:30

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गडचांदुर परिसरात फिरत असताना गडचांदूर-भोयगावकडे चार चाकी वाहनाने दारुची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारावर पोलिसांनी गडचांदूर ते भोयगाव रोडवरील रेल्वेगेटजवळ नाकाबंदी केली. यावेळी एमएच २९ बीसी ५०६६, व एमएच २९ व्ही ७००९ या वाहनाची झडती घेतली.

Raids against drug dealers | दारुविक्रेत्यांविरोधात धाडसत्र

दारुविक्रेत्यांविरोधात धाडसत्र

Next
ठळक मुद्दे२५ लाखांचा दारुसाठा जप्त : पाच जणांना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी गडचांदूर-भोयगाव मार्गावर नाकाबंदी करुन दोन चारचाकी वाहनातून ३१६६ बॉटल देशी दारु व वाहन असा सुमारे २५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन पाच जणांना अटक केली.
निलेश मधुकर परगंटीवार (३६), राजू मारोती अल्लीवार (२१), राजेश लिगन्ना पोन्नलवार (३२) तिघेही रा. जैताई नगर वणी जि. यवतमाळ, भारत दुर्गन्ना रामगिरवार (३५)रा. जैताई नगर वणी, दीपक दिवाकर येरमे (३५) रा. हनुमान नगर वणी असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गडचांदुर परिसरात फिरत असताना गडचांदूर-भोयगावकडे चार चाकी वाहनाने दारुची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारावर पोलिसांनी गडचांदूर ते भोयगाव रोडवरील रेल्वेगेटजवळ नाकाबंदी केली. यावेळी एमएच २९ बीसी ५०६६, व एमएच २९ व्ही ७००९ या वाहनाची झडती घेतली. दोन्ही वाहनातून ३१६६ बॉटल देशी दारु व दोन्ही वाहन असा एकूण २५ लाख २० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन पाच जणांना अटक केली.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक ओ. जी. कोकाटे यांच्या नेतृत्वात संजय आतकुलवार, अमोल, गोपाल, रवी, प्रशांत, सुरेश, गडचांदुर येथील सफौ सुनील बोरीकर यांनी केली.

बल्लारपुरात १६ लाखांच्या दारुसाठ्यासह दोघांना अटक
बल्लारपूर : पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने नाकाबंदी करुन ऑटो क्र. एमएच ३४ डी ३६९१ व दुचाकी क्रमांक एमएच ३४ बी क्यू १८५ या वाहनाची झडती घेऊन १५ लाखांच्या दारुसह सुमारे १६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. मोसिन खान पठाण व प्रवीण नातर असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक एस. एस. भगत, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास गायकवाड, सुनील कांबळे, सुधाकर वरघणे, संतोष खंडेलवार, मनोज पिदुरकर, शरद कुडे, शेखर मानकर, श्रीनिवास आबिटकर, स्वप्नील बोरकर आदींनी केली.

Web Title: Raids against drug dealers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.