शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठ्यावरून आमसभेत गदारोळ

By admin | Updated: December 19, 2015 00:43 IST

चंद्रपूर शहरातील पाणी पुरवठा मागील अनेक महिन्यांपासून कोलमडला आहे. याबाबत नागरिकांचा नगरसेवकांवर रोष व्यक्त होत आहे.

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील पाणी पुरवठा मागील अनेक महिन्यांपासून कोलमडला आहे. याबाबत नागरिकांचा नगरसेवकांवर रोष व्यक्त होत आहे. त्यामुळे आज शुक्रवारच्या महापालिकेच्या आमसभेत नगरसेवकांनी याबाबत संताप व्यक्त करून चांगलाच गदारोळ घातला. वारंवार सूचना देऊनही उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनी पाणी पुरवठा वितरणाच्या कामात सुधारणा करीत नसल्याने मनपा प्रशासनाने कडक पावले उचलण्याचा निर्णय आजच्या आमसभेत घेतला.चंद्रपूर शहरात मागील अनेक महिन्यांपासून पाणी पुरवठा सुरूळीत होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. अनेक भागात नळाला पाणीच येत नाही. काही ठिकाणी पाणी आले तर ते केवळ अर्धा-एक तासच येते. अशातच नळाची धारही मोठी नसते. त्यामुळे नागरिकांना इरई धरणात पाणीसाठा असताना व घरी नळ असतानाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विशेष म्हणजे, पाणी पुरवठा करणाऱ्या उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीने नागरिकांना कोणतीही सूचना न देता पाणी पुरवठ्याच्या वेळेत बदल केला. याबाबतही नागरिकांच्या तक्रारी आहेत. याचा जाब अनेक वॉर्डातील नागरिकांनी नगरसेवकांना विचारला व आपला रोष व्यक्त केला. त्यामुळे नगरसेवकही संतापलेले होते. हा संताप आजच्या आमसभेत निघाला. नगरसेवक प्रविण पडवेकर, नंदू नागरकर, संजय वैद्य यांच्यासह बहुतेक नगरसेवकांनी पाणी पुरवठ्याचे कंत्राट रद्द करण्याची मागणी केली. नगरसेवक राजकुमार ऊके यांनी तर तक्रारी असतानाही त्या कंत्राटदाराकडे अजूनही कंत्राट का ठेवण्यात आले आहे, असा प्रश्न उपस्थित केला. यामुळे आमसभेत चांगलाच गदारोळ झाला. कोलमडलेल्या पाणी पुरवठ्याबाबत आयुक्तांना जाब विचारण्यात आला. त्यानंतर महानगरपालिकेने याबाबत संबंधित कंत्राटदाराला अनेकदा सूचित केले असून कारणे दाखवा नोटीस व दंडात्मक कारवाईही केल्याचे सांगितले. मात्र नगरसेवकांचे समाधान होत नसल्याने पाणी पुरवठ्याबाबत कडक पाऊल उचलण्याचे निश्चित झाले. यापुढे म्हणजे १ जानेवारी २०१६ पासून नागरिकांनी पाणी पट्टी कर महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात भरावे. उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे त्याचा भरणा करू नये, असे आवाहन मनपा प्रशासनाकडून केले जाणार आहे. त्यानंतर या कंत्राटासाठी पुन्हा नव्याने निविदा मागविण्यात येणार असल्याची माहितीही आयुक्तांनी सभागृहात दिली. विशेष म्हणजे, संबंधित कंत्राटदार न्यायालयात जाणार असे गृहित धरून मनपाने आधीच कॅवेट दाखल केल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.त्यानंतर जागा आरक्षणाचा विषय चर्चेला आला. वडगाव येथील विजय आर्इंचवार यांची जागा आहे. मात्र ही जागा मनपाच्या दवाखान्यासाठी आरक्षित आहे. त्यामुळे या जागेवरील आरक्षण काढावे किंवा जागेची किमत देऊन जागा मनपाने ताब्यात घ्यावी, या आशयाचे पत्र आर्इंचवार यांनी मनपाला दिले आहे. याबाबत सभागृहात चर्चा झाल्यानंतर सदर जागा ६२ लाख रुपये देऊन दवाखान्यासाठीच आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. बाबुपेठ परिसरात स्टेडीयम तयार करण्याचा प्रस्ताव महापौर राखी कंचर्लावार यांनी मांडला. क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी हा प्रस्ताव सभागृहात मंजूर करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)