शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

चिमूर तालुक्यात एटीएमद्वारे मिळणार शुद्ध पाणी

By admin | Updated: April 11, 2016 01:02 IST

देशात विज्ञानाच्या प्रगतीने व मानवाचा वेळ वाचावा, यासाठी नागरिकांना एटीएम मशीनमधून पैसे काढता येतात.

भांगडियांचा उपक्रम : सहा गावात लागणार एटीएम सयंत्रचिमूर : देशात विज्ञानाच्या प्रगतीने व मानवाचा वेळ वाचावा, यासाठी नागरिकांना एटीएम मशीनमधून पैसे काढता येतात. ही एटीएम मशीन आता पैसे काढण्यासाठीच सीमित न राहता शुद्ध पाणीही देणार आहे.जल जीवन आहे मनवाच्या सुदृढ आरोग्यासाठी शुद्ध पाणी गरजेचे आहे. दूषित पाण्यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात येते. यासाठी शासन नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, म्हणून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे गावात नळयोजनेतून पाणी पुरवठा करण्यात येतो. तरीही अनेक भागात नळाचे पाणी मोठ्या प्रमाणात पोहचत नाही. यासाठी नेहमीच नागरिकांची ओरड असते.नागरिकांची ही ओरड लक्षात घेऊन चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी चिमूर शहरात एटीएमद्वारे पाणी पुरवठा करण्याचा उपक्रम जिल्ह्यात सर्वप्रथम सुरू केला. आजघडीला चिमूर शहरातील वडाळा येथे हे संयत्र नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करीत आहे. हा प्रयोग आमदार भांगडिया यांनी स्वखर्चातून केला होता. एटीएमद्वारे पाणी देण्याचा हा प्रयोग चिमुरातील वडाळा प्रभागात यशस्वी झाल्याने इतर गावातही शुद्ध पाणी पुरवठाची एटीएम योजना पोहोचवावी म्हणून त्यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत सहा गावांत ही योजना मंजूर केली आहे.चिमूर तालुक्यातील अनेक गावांत फ्लोराईडयुक्त पाण्याचा पुरवठा आजही होत आहे. त्यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र नागरिकांना भेडसावणाऱ्या या पाण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळावी याकरीता तालुक्यातील खडसंगी, मोटेगाव, तळोधी (बा), मासळ, जांभुळघाट व आंबोली या गावात शुद्ध पाण्याच्या एटीएम मशीन लागणार आहेत. यासाठी विधान परिषद सदस्य मितेश भांगडिया यांच्या स्थानिक विकास निधीतून ३५ लाख ८८ हजार रुपयांचा निधी मंजूर करम्यात आला आहे. त्यामुळे या सहा गावातील नागरिकांना एटीएमद्वारे शुद्ध पाणी पुरवठा होणार आहे.गावातील पाण्याच्या स्त्रोतातून पाणी एटीएम मशीनमध्ये घेवून त्यामध्ये शुद्ध करण्यात येणार आहे. गावातील इच्छुक नागरिकांना काही ठराविक मासिक शुल्क आकारून एटीएम कार्ड देण्यात येणार आहे. कार्ड टाकताच प्रत्येक नागरिकाला २० ते ३० लिटर पाणी मशीनमधून मिळणार आहे. हे कार्ड दुसऱ्यांदा वापरता येणार नाही. या सयंत्राच्या देखभालीसाठी काही शुल्क भरावे लागणार आहे. यामुळे टंचाईत दिलासा मिळणार आहे. (लोकमत चमूू)