पाच दिवसांत चार हजार ८१९ क्विंटल खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 05:00 IST2020-12-13T05:00:00+5:302020-12-13T05:00:18+5:30

मागील वर्षी आदिवासी विकास महामंडळ व पणन महासंघाकडून कृउबास आणि खुल्या बाजारापेक्षा जास्त भाव देण्यात आल्याने आदिवासी विकास महामंडळ व पणन महासंघाने प्राधिकृत केलेल्या सोसायटयांकडे धान विक्रीसाठी चांगलाच कल वाढला होता. बहुसंख्य शेतकºयांनी या सोसायटया आणि पणनमहासंघाच्या केंद्रांवरच धानाची विक्री केली होती. मागील वर्षी नागभीड तालुक्यात आठ आदिवासी सोसाटया व दोन पणन महासंघाच्या केंद्रांमार्फत धान खरेदी करण्यात आली होती. 

Purchase of 4,819 quintals in five days | पाच दिवसांत चार हजार ८१९ क्विंटल खरेदी

पाच दिवसांत चार हजार ८१९ क्विंटल खरेदी

ठळक मुद्देबाजार समितीत धानाची आवक वाढली, समितीच्या आवारात वाहनांची गर्दी

  घनश्याम नवघडे
    लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : नागभीड कृउबासमध्ये धानाची आवक चांगलीच वाढली आहे. या बाजार समितीत गेल्या पाच दिवसात चार हजार ८१९ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. 
कृऊबासमध्येही धानाचे भाव वाढले आहेत. मागील आठवडयात धानाचा भाव २ हजार ४०० रूपयांपर्यंत पोहचला होता. आता या भावात काही प्रमाणात घसरण झाली आहे. उच्च प्रतीच्या धानाला २ हजार ३०० रूपयापर्यंत दर आहे. मात्र शेतकºयांचा धान विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कल असल्याचे दिसून आहे.
मागील वर्षी आदिवासी विकास महामंडळ व पणन महासंघाकडून कृउबास आणि खुल्या बाजारापेक्षा जास्त भाव देण्यात आल्याने आदिवासी विकास महामंडळ व पणन महासंघाने प्राधिकृत केलेल्या सोसायटयांकडे धान विक्रीसाठी चांगलाच कल वाढला होता. बहुसंख्य शेतकºयांनी या सोसायटया आणि पणनमहासंघाच्या केंद्रांवरच धानाची विक्री केली होती. मागील वर्षी नागभीड तालुक्यात आठ आदिवासी सोसाटया व दोन पणन महासंघाच्या केंद्रांमार्फत धान खरेदी करण्यात आली होती. 
आदिवासी विकास महामंडळ व पणन महासंघाकडून बोनससह २ हजार ५५० रूपयांपर्यंत भाव मिळत असल्याने आणि बाजार समितीत २ हजार २०० रूपयांपर्यंतच भाव मिळत असल्याने शेतकºयांनी कृउबासकडे जवळपास पाठ फिरवल्यासारखेच चित्र होते. मात्र यावर्षी परिस्थिती उलट आहे.
बाजार समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार ५ डिसेंबरला १०५६.८१ क्विंटल , ७ डिसेंबरला १ हजार १९२ क्विंटल , ९ डिसेंबरला ५४० क्विंटल,१० डिसेंबरला ८०० क्विंटल आणि ११ डिसेंबरला १ हजार २३१ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे, हे येथे उल्लेखनीय.

Web Title: Purchase of 4,819 quintals in five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.