अन् त्यांनी चक्क तहसील कार्यालयात चराईसाठी सोडल्या बकऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2022 04:50 PM2022-10-15T16:50:25+5:302022-10-15T16:52:51+5:30

शाळा बंद निर्णयाचा विरोध : ‘शाळा सोडा, बकऱ्या चारा’ आंदोलन

Protest against school closure decision of having less than 20 students: Aam Aadmi Party's agitation against administration | अन् त्यांनी चक्क तहसील कार्यालयात चराईसाठी सोडल्या बकऱ्या

अन् त्यांनी चक्क तहसील कार्यालयात चराईसाठी सोडल्या बकऱ्या

Next

चिमूर (चंद्रपूर) : शिंदे-फडणवीस सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या शाळा समायोजन व २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध म्हणून चिमूर येथे आम आदमी पार्टीतर्फे शुक्रवारी दुपारी ‘शिक्षण सोडा, बकऱ्या चारा’ आंदोलन करण्यात आले. त्यात तहसील कार्यालयात चक्क बकऱ्या चारून सरकारचा निषेध करण्यात आला.

ग्रामीण भागामध्ये आधीच शिक्षणाची उदासीनता आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शिक्षण व्यवस्थेत सुधार करून मुला-मुलीना शिक्षणासाठी प्रेरित करणे गरजेचे आहे. परंतु सरकारच्या निर्णयामुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होण्याची वेळ येत आहे. ग्रामीण भागातील नवीन पिढीचे शिक्षण खुंटविण्यात व त्यांना जंगलात बकऱ्या चरण्यासाठी व बालमजुरीसाठी शिंदे-फडणवीस सरकारची चुकीची नीती जबाबदार आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.

सरकारने कमी पटसंख्या असलेल्या शाळा चालविणे हे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे सांगितले आहे. त्यावर उपाय म्हणून आमदारांचे पेन्शन बंद करून तो पैसा ग्रामीण भागातील शाळांना पुनरुज्जिवित करण्यासाठी का वापरण्यात येऊ नये, असाही सल्ला देत सरकार खाण्या-पिण्याच्या वस्तूंपासून सर्वच गोष्टींवर जीएसटी वसूल करते, जनतेच्या या पैशांचा वापर आमदार-मंत्र्यांच्या चैनीसाठी न करता शिक्षणावर का करू नये,असे अनेक प्रश्न सरकारला यावेळी विचारण्यात आले. चिमूर विधानसभेतील ६० शाळा आम्ही बंद होऊ देणार नाही, यासाठी रस्त्यावर उतरून गावोगावी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आपतर्फे देण्यात आला. 

Web Title: Protest against school closure decision of having less than 20 students: Aam Aadmi Party's agitation against administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.