शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

प्रचंड गदारोळात अर्थसंकल्प सादर

By admin | Updated: February 26, 2016 00:56 IST

चंद्रपूर महानगरपालिकेचा सन २०१६-१७ चा अर्थसंकल्प आज गुरुवारी महापालिकेच्या आमसभेत सादर करण्यात आला.

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेचा सन २०१६-१७ चा अर्थसंकल्प आज गुरुवारी महापालिकेच्या आमसभेत सादर करण्यात आला. अर्थसंकल्प सादर करतानाच मालमत्ता करवाढीचा मुद्दा उपस्थित करून विरोधकांसह काही नगरसेवकांनी सभागृहात एकच गदारोळ केला. ही करवाढ नागरिकांची कंबरडे मोडणारी असल्याचे सांगत नगरसेवकांनी गोंधळ घातला. नगरसेवक नंदू नागरकर व काही नगरसेवकांनी चक्क बजेट फाडून महापौरांच्या दिशेने भिरकावल्याने एकच गदारोळ झाला. अखेर या गदारोळामुळे सभापतींच्या भाषणापूर्वीच आमसभा संपल्याचे घोषित करण्यात आले. तत्पूर्वी महानगरपालिकेचा २०१६-१७ चा ३९९ कोटींचा अर्थसंकल्प संख्याबळाचा आधार घेत मंजूर करण्यात आला.महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पासाठी आज महापालिकेच्या नवीन इमारतीच्या सभागृहात आमसभा आयोजित करण्यात आली. महापौर राखी कंचर्लावार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आमसभेत स्थायी समितीचे सभापती संतोष लहामगे यांनी २०१६-१७ चा अर्थसंकल्प मंजुरीसाठी सादर केला. या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची करवाढ प्रस्तावित करण्यात आली नसल्याचे सभापती लहामगे यांनी सांगितले. त्यानंतर नगरसेवकांनी करवाढीचा विषय रेटून धरला. मालमत्ता करात पाचपट वाढ करण्यात आली आहे. तशा नोटीस नागरिकांना मिळत आहेत. तरीही करवाढ बजेटमध्ये प्रस्तावित नाही, असे म्हणणे केवळ दिशाभूल करणे आहे, असा आरोप नगरसेवक प्रशांत दानव यांनी केला. मागील वर्षीच्या तुलनेत एकदम पाच पट करवाढ करणे म्हणजे सर्वसामान्य नागरिकांने कंबरडे मोडणेच आहे, असे म्हणत दानव यांनी करवाढ मागे घेण्याची मागणी केली. दानव यांच्या मागणीला अनेक नगरसेवकांनी पाठिंबा देत गोंधळ घातला. यावर उत्तर देताना उपायुक्त इंगोले यांनी कुठलीही करवाढ केली नसून मालमत्तेचे व्यवस्थित मुल्यांकन केल्यामुळे कर वाढल्याचे सांगितले. पूर्वी मनपाच्या कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षणानंतर कमी मालमत्ता दाखविली होती. याशिवारी व्यावसायिक इमारतींना रहिवासी नमूद केले होते. वाढलेल्या बांधकामाचेही सर्वेक्षण झाले नव्हते. त्यामुळे कर यापूर्वी कमी आकारण्यात येत होता, हे स्पष्ट केले. मात्र नगरसेविका सुनिता लोढिया यांनी यावर आक्षेप घेतला. ज्या ठिकाणी वाढीव बांधकाम झालेले नाही, तिथेही मालमत्ता करात चार पट वाढ करण्यात आली आहे, असे सांगत यावर महापौरांना जाब विचारला. नगरसेवक संजय वैद्य यांनी तर अंदाजपत्रकातील जमाखर्चाचे आकडे कसे दिशाभूल करणारे आहे, हे मागील वर्षीच्या अंदाजपत्रकाचे उदाहरण देऊन सभागृहापुढे मांडले. उत्पन्नात दाखविलेले सफाई शुल्क, गुंठेवारी, चटाई क्षेत्र, वाहनतळ याद्वारे मिळणारे उत्पन्न मागील वर्षीपैकी आणखी कमी दाखविण्यात आले असून एकूण अंदाजपत्रकात नियोजनाचा अभाव असल्याचे ते म्हणाले. मनपाने अमृत अभियानासाठी ३५८ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. यासाठी मनपाचा हिस्सा म्हणून २५ कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. यावरही वैद्य यांनी आक्षेप घेतला. कोणत्या निकषाखाली ही योजना ३५८ कोटीतच पूर्ण होईल, असा सवाल करीत योजनेची किंमत वाढली तर मनपा पैसा आणणार कुठून, याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. मात्र यावर प्रचंड गदारोळ करण्यात आला. अखेर संजय वैद्य यांनी बाजू व्यवस्थित मांडू देत नसल्याची खंत व्यक्त करीत सभात्याग केला. नगरसेवक नंदू नागरकर यांनी मालमत्ता कर वाढवून नागरिकांवर आर्थिक बोझा लादल्याचे सांगत करवाढ एकदम लादू नका, अशी मागणी केली. यावर कुणीच बोलायला तयार नसल्याचे संतप्त होत नागरकर व काही नगरसेवकांनी चक्क अर्थसंकल्प फाडून महापौरांच्या दिशेने भिरकावले. दुसरीकडे काँग्रेसच्या नगरसेवकांनी करवाढीचा निषेध, महापौरांचा निषेध अशा घोषणा देणे सुरू केले. (शहर प्रतिनिधी)असा येणार पैसामालमत्ता कराच्या माध्यमातून ४० कोटीपाणी पुरवठा लाभ कराच्या माध्यमातून १ कोटीसफाई शुल्कचा माध्यमातून ६.४० कोटीरस्ता कराच्या माध्यमातून ४ कोटी गुंठेवारीतून ५ कोटी बांधकाम परवाने व विकास शुल्क यांचा माध्यमातून ४ कोटीवाढीव चटई क्षेत्र परवानगीतून ५ कोटीरस्त्यावर चारचाकी पार्किंग १ कोटीवार्षिका मसूदा फीच्या माध्यमातून ५० लक्ष गोल बाजारातील अतिरिक्त बांधकामातून १ कोटीमालमत्ता कराचा दंड आकारुन या माध्यमातून १ कोटीजाहिरातीतून ५० लक्षस्थानिक संस्था कराच्या माध्यमातून १ कोटीमालमत्तांचा मालकी हक्काच्या हस्तांतरण शुल्काच्या माध्यमातून १ कोटीघनकचरा व्यवस्थापन उपविधीच्या माध्यमातून २५ लक्ष.खासगी प्रवासी बस धारकांसाठी वाहनतळ उपभारुन मोठ्या बस करीता २० हजार व छोट्या बस करीता १० हजार असे शुल्क आकारुन २० लक्ष उत्पन्न अपेक्षित आहे.असा जाणार पैसाअमृत अभियानासाठी २५ कोटी नागरिकांना डस्टबीन पूरविणे यासाठी १.५० कोटीरेन वॉटर हर्वेस्टिंग अनुदान योजना राबविण्यासाठी १ कोटीवाय-फाय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी २५ लक्षविविध योजनामध्ये महापालिकेच्या हिस्सा ४८.३५ कोटीखुल्या जागांचा विकास १ कोटीमॉडेल शाळा तयार करण्यासाठी ३ कोटीस्मशान भूमीच्या विकास करणे यासाठी २ कोटीशहर सौंदर्यीकरण करण्यासाठी १.७० कोटीमहापौर चषक व सांस्कृतिक कार्यक्रम ३५ लक्षरस्त्यांची दुरुस्ती व बांधकाम यासाठी ७२.४५ कोटीनाल्याची दुरुस्ती व बांधकाम १५ कोटीघनकचरा व्यवस्थापन अंतर्गत घनकचरा वाहतूक यासाठी ५ कोटीमीनी बस सेवा सुरू करण्याच्या उद्देशाने १ कोटीपथदिव्याचे आधुनिकीकरण २ कोटीचंद्रपूर विकास योजना आराखडा (मुळ रद्द) मधील आरक्षणे विकसीत करण्याकरीता २ कोटीअतिक्रमीत ५५ झोपडपट्यांचे सर्व्हेक्षणासाठी ४० लक्षनेताजी भवन विकसीत करण्यासाठी १.५० कोटीकोहीनूर तलाव व बाबुपेठ स्टेडियम नुतनीकरण यासाठी २.५० कोटीवाहनतळ निर्मितीसाठी ५० लक्षविद्युत खांब स्थलांतरीत करणे व भूमिगत केबल यासाठी ५० लक्षशहरात नवीन विद्युत लाईन टाकण्यासाठी २ कोटीभूमीगत गटार जोडणीची उर्वरीत कामे पूर्ण करण्याकरीता १ कोटीमहानगरपालिका कॉलनीकरीता जागा खरेदीसाठी ५० लक्ष.