कुक्कुटपालन व्यवसायिक डबघाईस
By Admin | Updated: November 7, 2016 01:29 IST2016-11-07T01:29:05+5:302016-11-07T01:29:05+5:30
शेतीसोबतच जोडधंदा करून आपली आर्थिक प्रगती साधण्याच्या हेतूने शासनाने सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या मागे न लागता आपला स्वत:चा

कुक्कुटपालन व्यवसायिक डबघाईस
शासनाचे दुर्लक्ष : खाजगी कंपनीची मक्तेदारी
चिखलपरसोडी : शेतीसोबतच जोडधंदा करून आपली आर्थिक प्रगती साधण्याच्या हेतूने शासनाने सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या मागे न लागता आपला स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याकरिता कुटीरउद्योगांना चालना देण्यासाठी अनेक प्रकारच्या योजनाच्या माध्यमातून शेतीपुरक जोडधंद्याकडे बळण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. त्यामध्ये कुक्कुटपालन, गोटफार्म, वराहपालन, नेटहाऊस, औषध प्लॉट स्टेशन यासारख्या व्यवसायाकरिता तालुकास्तरावरून बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिल्या जात आहे. याचा फायदा घेत अनेक सुशिक्षित बेरोजगार शेतकरी घेत असले तरी ते कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या खाजगी कंपनीच्या मक्तेदारीमुळे डबघडीस आले आहेत.
खाजगी कंपनीकडे स्वत:चे शेड आहे. या कंपन्या स्वत:चा माल स्वत:च तयार करून स्वत:च बाजारामध्ये विक्री करतात. त्यामध्ये काही व्यवसायिकही कंपनीच्या अटीनुसार सहभागी होतात. त्याकरिता साधारणत: ३५०० हजार नग कोंबडी तयार करण्याची क्षमता असलेले शेड असणे गरजेचे आहे. त्यामुळे यामध्ये हजार- दोन हजाराची क्षमता असलेले आणि लहान व्यवसायिक सहभागी होऊ शकत नाहीत.
आजची स्थिती पाहून जाता एक दिवसाच्या बॉयलर जातीच्या एका पिलाची किंमत ३५ रुपये आहे. ते दोन किलो वजनाचे बनण्यासाठी साधारणत: तीन ते साडेतीन किलो खाद्य लागते.सोबत औषध, कोंडा व इतर खर्च एकत्र केल्यास कंपनीच्या खरेदीभावापेक्षा लागत खर्च अधिक होत आहे. त्यामुळे शासनाद्वारे या व्यवसायाकडे जातीने लक्ष दिले किंवा खाजगी कंपनीवर खरेदी-विक्रीच्या काही अटी घातल्या तर शेतीसोबतच या व्यवसायाला चांगले दिवस येतील. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार नोकरीच्या मागे न लागता निश्चितच अशा व्यवसायाकडे कळू शकतात. (वार्ताहर)
भाव ठरविण्यात कंपन्यांचा एकाधिकार
या व्यवहारात तयार कोंबड्यांचा खरेदी दर कंपनी ठरवित असल्याने बाजारभावसुद्धा त्यानुसार चालतो. लहान व्यवसायिक कंपनीची जोडलेला नसतानासुद्धा त्याची झळ त्याला सोसावी लागत आहे. सणासुदीला व दिवस पाहून या कंपन्या दररोज खरेदी भावाचा चढउतार करीत असतात. या व्यवसायामध्ये भांडवल मोठ्या प्रमाणावर लागत असते. तर त्यानुसार निघणारा माल व त्यावेळेस बाजाराची स्थितीनुसार कंपनी भाव निश्चित करते. तोच भाव सर्वांसाठी ठरत असल्याने लहान कुक्कुटपालन व्यवसायिकांना कधीकधी तोटाही सहन करावा लागत आहे.