जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 05:00 AM2020-08-14T05:00:00+5:302020-08-14T05:00:59+5:30

काही दिवसापूर्वी ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या बदलीसंदर्भात परिपत्रक काढले होते. दरम्यान, कोरोना संसर्ग लक्षात घेता प्रशासकीय पदली रद्द करून केवळ विनंती बदली करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले. मात्र विनंती बदलीसाठी पात्र शिक्षकांबाबत स्पष्टता नसून १५ टक्के प्रशासकीय बदल्यांबाबतही निश्चिती करण्यात आली नाही.

Postponement of transfer process of teachers in Zilla Parishad | जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला स्थगिती

जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला स्थगिती

Next
ठळक मुद्देसीईओंचे पत्र : काही शिक्षकांमध्ये खुशी तर काहींमध्ये ‘गम’

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा परिषदेमधील काही विभागातील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया जुलै महिन्यात पार पडली. त्यानंतर शिक्षण तसेच आरोग्य विभागातील बदली प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु बदलीपात्र शिक्षकांच्या अनेक मुद्यांवर स्पष्टता नसल्याने शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कर्डिले यांनी स्थगिती दिली आहे.
काही दिवसापूर्वी ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या बदलीसंदर्भात परिपत्रक काढले होते. दरम्यान, कोरोना संसर्ग लक्षात घेता प्रशासकीय पदली रद्द करून केवळ विनंती बदली करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले. मात्र विनंती बदलीसाठी पात्र शिक्षकांबाबत स्पष्टता नसून १५ टक्के प्रशासकीय बदल्यांबाबतही निश्चिती करण्यात आली नाही. ज्या शिक्षकांची जिल्हा परिषदेअंतर्गत दहा वर्ष पूर्ण किंवा अधिक सेवा झाली आहे, किंवा कार्यरत शाळेत तीन वर्ष सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांनी विनंती अर्ज केल्यास त्यांना बदलीत सहभागी करण्याबाबतही शासनपत्रात स्पष्टता नाही. दोन शिक्षकी शाळेमधून एखाद्या शिक्षकाने विनंती अर्ज केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यताहीही होती. यासह अनेक मुद्यांवर स्पष्टता नसल्याने शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत स्थगिती देण्यात आली आहे. याबाबतचे एक पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी काढले असून जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पाठविले आहे. यामुळे मात्र बदलीपात्र काही शिक्षकांमध्ये खुशी तर काही शिक्षकांमध्ये नाराजीची सुर आहे.

यांच्या होणार होत्या बदल्या
सहायक शिक्षक सर्वसाधारण क्षेत्र एकूण २८५ शिक्षक, अवघड क्षेत्रातील ७६ असे एकूण ३७१ शिक्षक बदलीस पात्र होते. विषय शिक्षकांमध्ये सर्वसाधारण क्षेत्रातून (विज्ञान) १० आणि अवघड क्षेत्रातून १ असे एकूण ११, भाषा विषयांचे सर्वसाधारण २० आणि अवघड क्षेत्रातील ४ असे एकूण २४, सामाजिक शास्त्र विषयाचे सर्वसाधारण क्षेत्रातील ३ शिक्षक बदलीस पात्र आहे. मुख्याध्यापकांची २३ असे सर्व मिळून ४२२ शिक्षकांच्या बदल्या होणार होत्या.
शिक्षकांत नाराजी
सामान्य प्रशासन, कृषी विभाग, समाज कल्याण विभागातील बदली प्रक्रिया आटोपल्यानंतर शिक्षकांची बदली प्रक्रिया होणार होती. मागील तीन वर्षांपासून दुर्गम किंवा अवघड क्षेत्रात काम करीत असलेल्यांना सर्वसाधारण क्षेत्रात बदलीची आशा लागली होती. तसेच, विनंती बदली आणि अपंगाच्या बदली प्रक्रिया होणार नसल्याने त्यांना आता बदलीसाठी पुन्हा एक वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Web Title: Postponement of transfer process of teachers in Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.