जिवती (चंद्रपूर) : महाराष्ट्र -तेलंगणा राज्याच्या वादात ती १४ गावे महाराष्ट्र शासनाचीच असतानाही येथील नागरिकांनी शुक्रवारी तेलंगणा राज्याच्या आसिफाबाद विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी रांग लावल्याचे चित्र दिसून आले.ही १४ गावे तेलंगणाच्या केरामेरी मंडलमध्ये येत असून परमडोली व भोलापठार या दोन बुथवर तेलंगणा राज्याच्या आसिफाबाद विधानसभाकरिता निवडणूक होत आहे. वादग्रस्त १४ गावात तेलंगणाची निवडणूक होत असली तरी ती गावे महाराष्ट्राची आहेत. येथील नागरिकांची नावे मतदान यादीत असल्याचा आधार घेत तेलंगणा विविध विकासकामे करून नागरिकांना आपलेसे करण्यासाठी निवडणूक प्रकिया राबवित आहे.
तेलंगणा निवडणुकीत महाराष्ट्राच्या नागरिकांचे मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 04:59 IST