शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसीच्या जातीनिहाय जनगणनेसाठी खासदारांचे पंतप्रधानांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : चंद्रपूरचे खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन ...

ठळक मुद्देसिंचन, रोजगार, दीक्षाभूमीच्या विकासावर केली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूरचे खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चंद्रपूर मतदार संघातील अनेक प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. यासोबतच ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेसाठी त्यांनी पंतप्रधानांना साकडे घातले.२०२१ मध्ये राष्ट्रीय जनगणना होणार आहे. यामधे ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलम असावा, ओबीसीची स्वतंत्र जनगनणा होत नसल्याने समाजाला योग्य ते लाभ मिळू शकत नाही आहे. अनेक लोकांनी त्या विरुद्ध आंदोलनात्मक पावित्रा घेतलाय. त्यामुळे ओबीसी बांधवांसाठी स्वतंत्र कॉलम जनगनणेत असावा, अशी मागणी खा.धानोरकर यांनी पंतप्रधानांना भेटून केली.चंद्रपूरच्या दीक्षाभूमीला ऐतिहासिक वारसा आहे. अनेक बौद्ध बांधवांची आस्था याठीकाणी जुळलेली आहे. त्यामुळे दीक्षाभूमीच्या विकासासाठी योग्य निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी खा. धानोरकर यांनी केली.सिंचन प्रकल्पासाठी निधी द्यावाचंद्रपूर जिल्ह्यात अनेक सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. निम्न पैनगंगा, वडनेर हे सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी योग्य निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, अशी विनंती खा. बाळू धानोरकर यांनी पंतप्रधानांना केली. आॅर्डीनंस फॅक्टरीमधील २०५ लोकांनी नोकरीसाठी अर्ज दिले. पण त्यापैकी एकालाही नोकरी मिळू शकलेली नाही. यासंबधी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली.कर्नाटका एम्टा खाण सुरू करायावेळी धानोरकर यांनी कर्नाटक एम्टा ही खाण २०१५ पासून बंद आहे. ज्यामुळे अनेक कर्मचारी बेरोजगार झाले आहे. ही खाण पुन्हा सुरु करण्यात यावी, अशी मागणी केली. तत्कालीन पंंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांनी भद्रावती तालुक्यात तीन हजार एकर जमीन पावर प्लांटसाठी मंजूर केली. परंतु अजूनही तिथे कोणताही उद्योग सुरु होऊ शकला नाही. तिथे एखाद्या उद्योगाला मान्यता मिळाल्यास स्थानिकांना रोजगार मिळु शकेल. या क्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी कोळसा खाणीत गेल्या. त्यांना त्याचा योग्य मोबदला देऊन त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकºया देण्यात याव्या, अशी मागणी खा. धानोरकर यांनी केली.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जाती