कृषी केंद्रावर फलक लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 22:37 IST2018-08-28T22:37:15+5:302018-08-28T22:37:57+5:30
धान, कपाशी व अन्य पिकांवर आलेल्या किडींमुळे शेतकरी एकीकडे संकटात असल्याने कृषी विभागाने फवारणीबाबत योग्य मार्गदर्शन करावे. तसेच कृषी केंद्र मालकांनी फवारणी औषधीची उपलब्धता, योग्य औषधी वापरण्याचा सल्ला व किंमतीचे फलक दर्शनी भागात लावावे, असे निर्देश चंद्र्रपूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदने दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी यासंदर्भात बैठक घेण्यात आली.

कृषी केंद्रावर फलक लावा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : धान, कपाशी व अन्य पिकांवर आलेल्या किडींमुळे शेतकरी एकीकडे संकटात असल्याने कृषी विभागाने फवारणीबाबत योग्य मार्गदर्शन करावे. तसेच कृषी केंद्र मालकांनी फवारणी औषधीची उपलब्धता, योग्य औषधी वापरण्याचा सल्ला व किंमतीचे फलक दर्शनी भागात लावावे, असे निर्देश चंद्र्रपूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदने दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी यासंदर्भात बैठक घेण्यात आली.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी तथा सदस्य सचिव आर. आर. मिस्कीन निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, अ. मा. नरवाडे, वा. स. नामपल्लीवार, डॉ. विनोद गोरंटीवार, दत्तात्रेय गुंडावार, आशिष कोट्टावार, सचिन चिंतावार, मनिष व्यवहारे, कविश्वर साळवे, जगदीश रायठ्ठा, डब्ल्यु. जी. कुरेशी, नितीन गुंडेज्या, गिरिधरसिंह बैस, हर्षवर्धन पिपरे, कल्पना बगुलकर, मीनाक्षी गुजरकर, संगीता लोंखडे, सदाशिव सुकारे, सुहास कोतपल्लीवार, डॉ. प्रीती बैतुले, डॉ. अजय गोगुलवार आदींची उपस्थिती होती. जिल्ह्यात यावर्षी पाऊस भरपूर आहे. पण पिकांवर आलेल्या कीडींमुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणती औषधी फवारणीसाठी वापरावी. त्याचे प्रमाण किती असावे, यासंदर्भात प्रत्येक कृषी केंद्राने फलक लावण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सदस्यांनी काही सूचनाही दिल्या.