शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

पाईपलाईन फुटल्याने संपूर्ण वाहतूक प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 06:00 IST

रस्त्याच्या मध्यभागी हे खोदकाम करण्यात आल्याने व रस्त्यालगत असलेली पाण्याची पाईपलाईन फुटल्याने अनेकांना पाण्याविणा राहावे लागल्याने न.प.विरोधात रोष व्यक्त होत आहे. दरम्यान शनिवारी सकाळी हा प्रकार काही नगर परिषद पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी महावितरण आणि पोलिसांकडे धाव घेऊन काम करणाऱ्या यंत्रणेविरोधात तक्रार दाखल केली.

ठळक मुद्देसंडे अँकर । नागरिकांमध्ये रोष, रस्त्याच्या ऐन मधोमध खोदकाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : पूर्व कल्पना न देता भरवस्तीतील रस्त्याचे मध्यरात्री ऐन मध्यातून खोदकाम करण्यात आल्याने संबंध नागभीडमध्ये नगर परिषद विरोधात संतापाची लाट उसळली आहे. खोदकाम करणाऱ्या व खोदकामाची परवानगी देणाºया दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.नागभीड शहरात भूमीगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम जॅक्सन लिमिटेड नोयेडा या कंपनीला देण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री १०.३० वाजतानंतर या कंपनीने दोन जेसीबी मशीनच्या सहाय्याने काम सुरू केले.दरम्यान, शनिवारी सकाळी नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आला. शहरातील अतिशय रहदारीचा असलेला हा रस्ता मधोमध चार फूट खोल खोदण्यात आल्याने आणि यातून निघालेली माती रस्त्याच्या दोन्ही बाजूला टाकण्यात आल्याने या रस्त्याची संपूर्ण वाहतूक बंद झाली आहे. अनेकांनी या रस्त्याने पायदळ येण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.रस्त्याच्या मध्यभागी हे खोदकाम करण्यात आल्याने व रस्त्यालगत असलेली पाण्याची पाईपलाईन फुटल्याने अनेकांना पाण्याविणा राहावे लागल्याने न.प.विरोधात रोष व्यक्त होत आहे. दरम्यान शनिवारी सकाळी हा प्रकार काही नगर परिषद पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी महावितरण आणि पोलिसांकडे धाव घेऊन काम करणाऱ्या यंत्रणेविरोधात तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त होताच नागभीड पोलीस नगर परिषदेत आले आणि परिस्थितीचे गांभिर्य जाणून घेतले. त्यानंतर याबाबत रितसर तक्रार करण्याच्या सूचना मुख्याधिकारी यांना दिल्या.मुख्याधिकारीच जबाबदारदरम्यान या मुद्यावरून नागभीड नगर परिषदेच्या नगर सेवकांनी पत्रकार परिषद घेऊन या परिस्थितीला मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण हेच जबाबदार असल्याचा आरोप केला. मुख्याधिकारी चव्हाण यांना न सांगता हे काम कसे काय केले जाईल. मुख्याधिकारी चव्हाण यांच्या संमतीनेच रात्रीच्या वेळी कंत्राटदाराने हे काम केल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत या नगरसेवकांनी केला. यावेळी नगर परिषदेचे बांधकाम सभापती सचिन आकुलवार, विरोधी गटनेते दिनेश गावंडे, आरोग्य सभापती रूपेश गायकवाड, नगर सेवक शिरिष वानखेडे हे यावेळी उपस्थित होते.नगर परिषदेने महावितरणला काम करण्याची परवानगी दिली होती. काम करून घेण्याची जबाबदारी महावितरणची होती.- चंद्रकांत चव्हाण,मुख्याधिकारी, नगरपरिषद, नागभीड.रस्त्याच्या एका बाजूने काम करावे व टप्प्य टप्प्यात काम व्हावे ही पद्धत आहे.- आर. यु. कारगावकरउपविभागीय अभियंता महावितरण

टॅग्स :Waterपाणी