पाईपलाईन फुटल्याने संपूर्ण वाहतूक प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 06:00 AM2019-12-01T06:00:00+5:302019-12-01T06:00:38+5:30

रस्त्याच्या मध्यभागी हे खोदकाम करण्यात आल्याने व रस्त्यालगत असलेली पाण्याची पाईपलाईन फुटल्याने अनेकांना पाण्याविणा राहावे लागल्याने न.प.विरोधात रोष व्यक्त होत आहे. दरम्यान शनिवारी सकाळी हा प्रकार काही नगर परिषद पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी महावितरण आणि पोलिसांकडे धाव घेऊन काम करणाऱ्या यंत्रणेविरोधात तक्रार दाखल केली.

The pipeline leaks affected the entire traffic | पाईपलाईन फुटल्याने संपूर्ण वाहतूक प्रभावित

पाईपलाईन फुटल्याने संपूर्ण वाहतूक प्रभावित

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । नागरिकांमध्ये रोष, रस्त्याच्या ऐन मधोमध खोदकाम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : पूर्व कल्पना न देता भरवस्तीतील रस्त्याचे मध्यरात्री ऐन मध्यातून खोदकाम करण्यात आल्याने संबंध नागभीडमध्ये नगर परिषद विरोधात संतापाची लाट उसळली आहे. खोदकाम करणाऱ्या व खोदकामाची परवानगी देणाºया दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
नागभीड शहरात भूमीगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम जॅक्सन लिमिटेड नोयेडा या कंपनीला देण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री १०.३० वाजतानंतर या कंपनीने दोन जेसीबी मशीनच्या सहाय्याने काम सुरू केले.
दरम्यान, शनिवारी सकाळी नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आला. शहरातील अतिशय रहदारीचा असलेला हा रस्ता मधोमध चार फूट खोल खोदण्यात आल्याने आणि यातून निघालेली माती रस्त्याच्या दोन्ही बाजूला टाकण्यात आल्याने या रस्त्याची संपूर्ण वाहतूक बंद झाली आहे. अनेकांनी या रस्त्याने पायदळ येण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.
रस्त्याच्या मध्यभागी हे खोदकाम करण्यात आल्याने व रस्त्यालगत असलेली पाण्याची पाईपलाईन फुटल्याने अनेकांना पाण्याविणा राहावे लागल्याने न.प.विरोधात रोष व्यक्त होत आहे. दरम्यान शनिवारी सकाळी हा प्रकार काही नगर परिषद पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी महावितरण आणि पोलिसांकडे धाव घेऊन काम करणाऱ्या यंत्रणेविरोधात तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त होताच नागभीड पोलीस नगर परिषदेत आले आणि परिस्थितीचे गांभिर्य जाणून घेतले. त्यानंतर याबाबत रितसर तक्रार करण्याच्या सूचना मुख्याधिकारी यांना दिल्या.

मुख्याधिकारीच जबाबदार
दरम्यान या मुद्यावरून नागभीड नगर परिषदेच्या नगर सेवकांनी पत्रकार परिषद घेऊन या परिस्थितीला मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण हेच जबाबदार असल्याचा आरोप केला. मुख्याधिकारी चव्हाण यांना न सांगता हे काम कसे काय केले जाईल. मुख्याधिकारी चव्हाण यांच्या संमतीनेच रात्रीच्या वेळी कंत्राटदाराने हे काम केल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत या नगरसेवकांनी केला. यावेळी नगर परिषदेचे बांधकाम सभापती सचिन आकुलवार, विरोधी गटनेते दिनेश गावंडे, आरोग्य सभापती रूपेश गायकवाड, नगर सेवक शिरिष वानखेडे हे यावेळी उपस्थित होते.

नगर परिषदेने महावितरणला काम करण्याची परवानगी दिली होती. काम करून घेण्याची जबाबदारी महावितरणची होती.
- चंद्रकांत चव्हाण,
मुख्याधिकारी, नगरपरिषद, नागभीड.

रस्त्याच्या एका बाजूने काम करावे व टप्प्य टप्प्यात काम व्हावे ही पद्धत आहे.
- आर. यु. कारगावकर
उपविभागीय अभियंता महावितरण

Web Title: The pipeline leaks affected the entire traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी