शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नक्की कोणते द्रव पाजायचा?
2
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
3
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
4
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
6
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
7
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
8
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
9
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
10
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
11
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
12
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
13
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
14
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
15
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
16
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
17
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
18
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
19
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
20
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
Daily Top 2Weekly Top 5

फिजिशियन गायब; रुग्ण उपचाराविना परतले

By admin | Updated: February 9, 2015 23:10 IST

अनेकांना सर्दी, खोकला ताप आदी आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे नागरिकांत स्वाईन फ्लू आजाराची भिती पसरली आहे. त्यामुळे अनेक आजारग्रस्त रुग्ण आज जिल्हा सामान्य रुग्णालयात

चंद्रपूर : अनेकांना सर्दी, खोकला ताप आदी आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे नागरिकांत स्वाईन फ्लू आजाराची भिती पसरली आहे. त्यामुळे अनेक आजारग्रस्त रुग्ण आज जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी गेले. मात्र, येथील फिजिशियन गायब असल्याने रुग्णांना तपासणीविनाच परतावे लागले. रुग्णालयाच्या या कारभाराप्रति नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोमवारी सकाळी ११ ते १२ वाजताच्या सुमारास चंद्रपूर येथील सर्दी, खोकल्याने त्रस्त काही रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात औषधासाठी गेले. या रुग्णांनी ओपीडीतून चिठ्ठी काढली. त्यावेळी रुग्णांना फिजिशियनकडे भेटून तपासणी करुन घेण्याचे सांगण्यात आले. रुग्णांनी सामान्य रुग्णालयातील कक्ष क्रमांक १४ मध्ये फिजिशियन यांच्याकडे तपासणीसाठी गेले. मात्र, ते उपस्थित नव्हते. एक ते दीड तास प्रतीक्षा करुनही ते आले नाही. याबाबत चौकशी केली असता, येथे उपस्थित कंपाऊंडरने फिजिशियन रुग्णालयासमोरील झाडासमोर असतील, असे सांगितले. घडलेल्या या प्रकाराबाबत रुग्णांनी ‘लोकमत’ला भेट देऊन माहिती दिली. जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण आढळल्याने नागरिकांत भीती पसरली आहे. त्यातच आरोग्य विभाग मात्र आपण अलर्ट असल्याचे सांगत आहे. परंतु, आज घडलेल्या प्रकारावरुन रुग्णालयात स्वाईन फ्लू सारख्या आजारग्रस्ताची तपासणी खरच व्यवस्था आहे का, असा प्रश्न रुग्णांनी केला आहे. उपस्थित नसणारे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे फिजिशियन यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रुग्णांनी केली. (स्थानिक प्रतिनिधी)