शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा योजनेत सहभागी व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:19 IST

मूल : खरीप हंगामात पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना सहभाग घेण्यासाठी अंतिम मुदत १५ जुलै असून तालुक्यातील जास्तीत ...

मूल : खरीप हंगामात पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना सहभाग घेण्यासाठी अंतिम मुदत १५ जुलै असून तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन तहसीलदार डॉ.रवींद्र होळी यांनी केले आहे.

पीक विमा योजनेसाठी २०२१ या हंगामाच्या नोंदणीसाठी राष्ट्रीय विमा संकेतस्थळ कार्यान्वित झालेले आहे. तालुक्यातील अधिसूचित क्षेत्रातील पिकासाठी पीक विमा क्षेत्र घटक धरून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी भारती ऍक्‍सा जनरल एन्शुरन्स कं. लि. या विमा कंपनीची नेमणूक केली आहे. हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, खरीप हंगामातील अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे केवळ अधिसूचित क्षेत्रात सर्वसाधारण क्षेत्राच्या ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी, लावणी न झाल्यास विमा संरक्षण, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, सर्वसाधारण काढणीच्या १५ दिवस आधीपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ आदी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर अधिसूचित क्षेत्रस्तरावर विमा संरक्षण मिळणार आहे. योजनेत समाविष्ट पिके तालुक्यातील खरीप हंगाम २०२१ मध्ये धान (भात), सोयाबीन, तूर पिकांचा समावेश करण्यात आला आहे. प्रतिकूल प​रिस्थितीत पिकांचे नुकसान टाळून उत्पादनात येणारी घट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा, असे आवाहन तहसीलदार होळी यांनी केले आहे.