आरटीईच्या वेळापत्रकाकडे पालकांच्या नजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST2020-06-23T05:00:00+5:302020-06-23T05:00:28+5:30
वंचित तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पालकांच्या पाल्यांना खासगी विनाअनुदानित, कायम विना अनुदानित खासगी व्यवस्थापनाच्या इंग्रजी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. यावर्षी पहिल्यादांच ऑनलाईन प्रकीया राबविण्यात आली. फेबु्रवारी महिन्यातच सोडत काढण्यात आली असली तरी प्रवेशासाठी मात्र मुहूर्त काढण्यात आला नाही.

आरटीईच्या वेळापत्रकाकडे पालकांच्या नजरा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : २५ टक्के आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून हिरवी झेंडी देण्यात आली. यापूर्वीच विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याने स्थानिक स्तरावरील प्रवेश वेळापत्रकांकडे पालकांचे लक्ष लागले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत वेळापत्रक निश्चित करण्याचे संकेत शिक्षण विभागाने दिले आहे.
वंचित तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पालकांच्या पाल्यांना खासगी विनाअनुदानित, कायम विना अनुदानित खासगी व्यवस्थापनाच्या इंग्रजी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. यावर्षी पहिल्यादांच ऑनलाईन प्रकीया राबविण्यात आली. फेबु्रवारी महिन्यातच सोडत काढण्यात आली असली तरी प्रवेशासाठी मात्र मुहूर्त काढण्यात आला नाही. संपूर्ण ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेवर कोरोना तसेच लॉकडाऊनचा परिणाम दिसून आला. त्यामुळे पालकांमधील अस्वस्थता चांगलीच वाढली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात १९७ शाळा ऑनलाईन प्रवेशासाठी पात्र ठरल्या असून एक हजार ८०७ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी तब्बल चार हजार ४१४ ऑनलाईन अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले. त्यापैकी एक हजार ७४२ विद्यार्थ्यांची सोडतीव्दारे निवड करण्यात आली. लॉकडाऊनमुळे आरटीई सोडतीमध्ये निवड झाली मात्र प्रवेश प्रक्रीया रखडली. त्यामुळे पालकांमध्ये धाकधूक पसरली होती. दरम्यान शासनाने प्रक्रियेला हिरवी झेंडी दिली आहे. त्यामुळे सर्व पालकांची वेळापत्रकांकडे नजरा लागल्या आहेत.
संस्थांना प्रतिपूर्तीच्या रक्कमेची प्रतीक्षा
लॉकडाऊ नमुळे सर्वत्र अडचणीचा डोंगर उभा ठाकला आहे. शासनाचे कुठलेही अनुदान न घेता चालणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा अतिशय अडचणीत आहेत. शिक्षणहक्क कायद्यानुसार २५ टक्के प्रवेशाच्या प्रतिपूर्तीचे तीन वर्षाचे करोडो रूपये जिल्ह्यातील संस्थांचे थकीत आहेत.
आर्थिक अडचणीमुळे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन शाळा व्यवस्थापन कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षाच्या ४० ते ५० टक्के फी पालकांकडून येणे बाकी आहे. त्यामुळे गाड्यांचे हप्ते इमारत भाडे, वीजबिल, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व चालकांचे पगार थकले आहे. त्यामुळे आरटीईचा थकीत परतावा, त्वरीत द्यावा, अशी मागणी होत आहे.