पंचायत समितीचे उपसभापती निरीक्षण तांड्रा व जिल्हा परिषदेच्या वर्तमान महिला व बालकल्याण सभापती नीतू चौधरी यांनी नगर परिषदेसंदर्भात सकारात्मक मत नोंदविले आहे. या अभिप्रायामुळे नगर परिषदेचा मार्ग मोकळा झाला आहे.
दि. ३० ऑगस्ट २०२० रोजी शासनाने नगर परिषदची अधिसूचना जारी केल्याने नगर परिषदेचा दर्जा मिळणार असल्याने आनंद व्यक्त होत असताना मात्र नंतर ११ डिसेंबरला सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्या. त्यात घुग्घुस ग्रामपंचायतीचा समावेश असल्याने शासनाच्या निर्णयामुळे परत नागरिकांत संभ्रम निर्माण झाला होता.
शासनाच्या या निर्णयामुळे नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त करीत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सहभागी न होण्याचा संकल्प केला. दरम्यान, सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन संयुक्त समिती स्थापन करून ग्रामपंचायत निवडणुकीत सहभागी न होण्याचा एकमताने निर्णय घेतला. बुधवारी (दि. ३०) नामांकन पत्र सादर करण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत एकाही इच्छुक उमेदवारांनी नामांकन पत्र सादर केले नाही. नामांकन पत्र सादर करण्याच्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत दररोज विविध आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधले. दरम्यान, तहसीलदार यांनी बैठक घेऊन निवडणुकीत भाग घेण्यासाठी समुपदेश केले. मात्र सर्व निवडणुकीत भाग न घेण्याच्या निर्णयावर ते ठाम राहिले.