राज्यातील सात वीज केंद्रांना दररोज एक लाख ४० हजार मेट्रिक टन कोळसा उपलब्ध आहे. चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातही सहा दिवस पुरेल इतका काेळसा शिल्लक असल्याची माहिती आहे. ...
उपजिल्हा रुग्णालय मूल येथे आता प्रसूतीचीही शस्त्रक्रिया होत आहे. त्यासाठी खासगी रुग्णालयात ४० ते ५० हजार रुपये मोजावे लागतात. गरीब व आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकाला एवढी रक्कम परवडणारी नसल्याने उपजिल्हा रुग्णालय मूल येथे मोफत सिझरिंग प्रसूती करण्याचा मा ...
धरमवीर यादव हा गुंड प्रवृत्तीचा होता. त्याच्याच दोन भावांच्या खुनाचा आरोप होता. अन्य गुन्हेही त्याच्यावर नोंद आहेत. त्याच्या या गुंड प्रवृत्तीमुळे अष्टभुजा परिसरातील नागरिक कमालीचे दहशतीत होते. तो बाहेर असला तर नागरिक घराबाहेर पडण्यास धजावत नव्हते. त ...
अष्टभुजा वाॅर्डातील रमा नगरात मंदिराजवळ त्याला गाठून तिघांनी धारदार शस्त्राने धरमवीरची निर्घृण हत्या केली. धरमवीर रक्ताच्या थारोळ्यात रात्रभर तिथेच पडून होता. सकाळी ही घटना उजेडात आली. ...
सन १९९८ पासून चंद्रपूर येथे सुरू असलेल्या शाळा न्यायाधिकरणमध्ये चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली जिल्ह्याचा समावेश होता. २० मे २०२२ नुसार शाळा न्यायाधिकरण पुनर्रचना शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई यांनी अधिसूचना प्रसिध्द करून चंद्रपूर येथील शा ...
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या बल्लारपूर विभागांतर्गत जिल्ह्याच्या अतिदुर्गम आदिवासी बहुल क्षेत्र असलेल्या जिवती उपक्षेत्रातून २०१५ रोजी तंत्रज्ञ पदावरून बापूजी गणपत जंपलवार हे सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांना निवृत्तीवेतन सुरू होणे अ ...
Chandrapur News एरव्ही वाघ शिकारीचा पाठलाग करताना अनेकदा पाहिलं असेल. पण वाघाच्या मागे अस्वल लागलंय आणि तो सैरावैरा धावतोय हे दृष्य नवीनच आहे. असं दृष्ट मंगळवारी ताडोबात पहायला मिळालं. ...
Chandrapur News चंद्रपूर हा वाघांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या वाघडोह या वाघाचे अलिकडेच निधन झाले. त्याच्या निधनामुळे दुःखी झालेल्या नागरिकांनी त्याला चक्क श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला. ...
Chandrapur News पोंभुर्णा तालुक्यातील वेळवा सेल्लुर या गावाशेजारी असलेल्या जंगलाला मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान भीषण आग लागल्याने शेकडो हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे. ...
Chandrapur News लग्नास नकार दिल्याने प्रियकराने चाकूने प्रेयसीचा गळा चिरला. यानंतर त्याने स्वत:च्या हाताच्या मनगटावर चाकूने घाव घातला. सोमवारी दुुपारी १ वाजेच्या सुमारास ऐतिहासिक माणिकगड किल्ल्यावर घडलेली घटना मंगळवारी पुढे आली. ...