सध्या वर्धा नदीचे पात्र कोरडे पडल्याने राजुरा शहराला होणारा पाणीपुरवठा मागील आठवड्यापासून ठप्प आहे. नदी पात्रात पाणी वळविण्यासाठी नगर परिषदेने जेसीबी लावून युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. ...
येथून जवळच असलेल्या मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चकघोसरी गावात पाणी समस्या बिकट बनली आहे. गावातील बुद्ध विहाराजवळील मुख्य हातपंप बंद पडल्याने नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ...
तालुका मुख्यालयापासून २० किमी अंतरावर असलेल्या मानोरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी गावकऱ्यांनी अनेक दिवसांपासून केली होती. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ही मागणी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे लावून धरली. ...
ताडोबा जंगलातील पशू पक्षी, वनवैभव, आदिवासींची जीवनशैली याबाबत चित्र रंगवून आणि प्राण्यांचे, त्यांच्या कळपासह पुतळे फलाटावर मोक्याच्या जागी उभे करून बल्लारपूर (बल्लारशाह) रेल्वे स्थानकाला सजवून शोभिवंत केले आहे. ...
मागील काही दिवसांपासून पुन्हा चंद्रपूरचे तापमान उच्चांक गाठू लागले आहे. मागील दोन दिवसांपासून सूर्याच्या पाऱ्याने ४५ अंश सेल्सीयस पार केले आहे. आज गुरुवारी चंद्रपूरचे तापमान ४७.६ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. या उन्हाळ्यातील आजवरचे हे सर्वाधिक तापमान ...
चंद्रपूर शहरातील अनेक वर्षे तांत्रिक आणि जमीन अधिग्रहणाच्या कामाने रखडलेला बाबुपेठ रेल्वे उड्डाणपूल साकारण्याचा मार्ग राज्य शासनाच्या ऐतिहासिक निर्णयाने मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी विशेष बाब म्हणून सरकारी जमिनीवरील अतिक्रमणधारकांना एक ...
चिमूर नगरपरिषद हद्दीतील सोनेगाव बेगडे येथील दोन शेतकरी कोटगाव परिसरातील शिवारात बैल व इतर जनावरे चराईसाठी गेले असताना एका पट्टेदार वाघाने हल्ला करुन त्यांना जखमी केले. ...
चंद्रपूर जिल्ह्यातून वैनगंगा, पैनगंगा, वर्धा व इरई या मोठ्या नद्या वाहात असून या सर्व मोठ्या नद्यांवर मोठी धरणे बांधलेली आहेत. पावसाळ्यात या धरणाची पातळी वाढल्यानंतर धरणातील पाण्याचा प्रवाह सोडण्यात येत असतो. ...
येथील कुरमार मोहल्ल्यातील पोचू बिरा कटलेलवार व इतर दोघांच्या मालकीच्या १७० शेळया व मेंढ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मूल येथे मंगळवारी रात्री १० वाजतादरम्यान घडली. याबाबत मूल पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...