शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदार सदस्य मतदानापासून राहणार दूर

By admin | Updated: March 2, 2015 01:06 IST

मागील एक वर्षांपासून वेगवेगळ्या कारणाने नियोजित निवडणूक प्रक्रिया लांबणीवर ठेवाव्या लागल्या. मात्र नव्या वर्षात सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया शासनाने सुरू केली आहे.

राजकुमार चुनारकर खडसंगीमागील एक वर्षांपासून वेगवेगळ्या कारणाने नियोजित निवडणूक प्रक्रिया लांबणीवर ठेवाव्या लागल्या. मात्र नव्या वर्षात सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया शासनाने सुरू केली आहे. त्यामध्ये चिमूर तालुक्यातील डी.डी.आर कार्यालयांतर्गत येणाऱ्या ४४ सहकारी संस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू असली तरी, शासनाच्या नवीन नियमानुसार अनेक थकबाकीदार सदस्य मतदान प्रक्रियेपासून दूर राहणार आहेत.राज्याच्या राजकारणामध्ये सहकार क्षेत्राची चांगलीच पकड आहे. सहकार क्षेत्राचा सरळ संबंध गावागावातील शेतकऱ्यांशी येतो. त्यामुळे राजकीय क्षेत्रातील पकड मजबुत करण्यासाठी अनेक पुढारी सहकार क्षेत्रात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करतात. सहकार क्षेत्रात सहकारी संस्थेचे सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती तथा स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य विधान परिषदेतील आमदार निवडीच्या प्रक्रियेत सुद्धा महत्त्वाचा दुवा ठरतात. राज्यात सध्या सहकारी संस्थाच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. चिमूर तालुक्यात आज घडीला एकूण ४४ सहकारी संस्था आहेत. त्यामध्ये ब गटाच्या १४ तर क गटाच्या ३० संस्था आहेत. तालुक्यातील ३० संस्थापैकी २३ संस्थांची निवडणूक प्रक्रिया पार पडली असून उर्वरीत संस्थेच्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहेत. ब गटाच्या १४ सहकारी संस्थापैकी ४ संस्थेच्या निवडणुका सुरू असून १० संस्थेच्या निवडणूक सुरू व्हायच्या, असल्याची माहिती दुय्यम निबंधक कार्यालयाने दिली. चिमूर तालुक्यातील सहकारी संस्थाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून अनेक संस्थाच्या निवडणुका अविरोध झाल्या आहेत. मात्र नवेगाव पेठ, वहानगाव, खडसंगी अशा अनेक गावातील व अनेक तालुक्यातील सहकारी संस्थाच्या निवडणुका होत आहेत.