शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

२२ लाख ४२ हजारांपैकी ३ लाख ४४ हजार नागरिकांनाच मिळाली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 05:00 IST

जानेवारी महिन्यात लसीकरण सुरू करताना आरोग्य विभागाने सर्वेक्षण करून लस घेणाऱ्या प्राधान्य गटातील २२ लाख ४२ हजार ६२ नागरिकांची नोंदणी केली. त्यामध्ये हेल्थ केअर वर्क, फ्रंट लाईन वर्कर, सहव्याधी, ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील आणि १९ ते ४४ वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. केंद्र सरकारकडून लस पुरविण्याचे नियोजनच कोलमडले. त्यामुळे मोठा गाजावाजा करून १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याच्या घोषणेचा फुगा फुटला. 

ठळक मुद्देपाच महिन्यांची स्थिती : कोविड लसीकरणात जिवती तालुका मागे तर भद्रावती पुढे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोविड प्रतिबंधक लसीकरणाला पाच महिने होत असूनही जिल्ह्यातील २२ लाख ४२ हजार ६२ लोकसंख्येपैकी बुधवारपर्यंत फक्त ३ लाख ४४ हजार ६७० नागरिकांनीच लस घेतली. जिवतीत सर्वात कमी तर भद्रावती तालुक्यात लस घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेची सज्जता दखलपात्र आहे. मात्र जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येचा विचार करता याच गतीने मोहीम सुरू राहिल्यास लस मिळण्यास किती वर्ष लागणार, असा प्रश्न नागरिक आता विचारू लागले आहेत.जानेवारी महिन्यात लसीकरण सुरू करताना आरोग्य विभागाने सर्वेक्षण करून लस घेणाऱ्या प्राधान्य गटातील २२ लाख ४२ हजार ६२ नागरिकांची नोंदणी केली. त्यामध्ये हेल्थ केअर वर्क, फ्रंट लाईन वर्कर, सहव्याधी, ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील आणि १९ ते ४४ वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. केंद्र सरकारकडून लस पुरविण्याचे नियोजनच कोलमडले. त्यामुळे मोठा गाजावाजा करून १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याच्या घोषणेचा फुगा फुटला. या गोंधळात राज्यांवर अवलंबून असणाऱ्या मनपा आरोग्य विभाग व जि. प. आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली. अखेर १८ वर्षांवरील लसीकरण थांबविण्यात आले. आता ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचे दैनंदिन नियोजन जिल्हा आरोग्य यंत्रणेला करावे लागत आहे. डोस मिळाले तर केंद्र सुरू अन्यथा बंद अशी कसरत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा करीत आहेत. जिवतीत सर्वात कमी ५ हजार २६७ जणांनी तर भद्रावती तालुक्यात तालुक्याच्या तुलनेत २८ हजार ४७४ जणांनी लस घेतली. जिल्ह्यात लस घेण्यास पात्र असणाऱ्या २२ लाख ४२ हजार ६२ नागरिकांपैकी आतापर्यंत ३ लाख ४४ हजार ६७० जणांना डोस घेता आले. जिल्ह्यात बुधवारी १४ हजार डोस आल्याने ११० केंद्रांवर लसीकरण सुरू झाले. 

तिसऱ्या लाटेच्या भीतीने केंद्रांवर गर्दीजिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आलेख घसरत आहे. ही दिलासादायक बाब आहे. तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविल्याने प्रत्येक नागरिकाला प्रतिबंधात्मक लस पुरविणे तातडीची गरज आहे. केंद्र सरकारचे लस धोरण नियोजन फसल्याने नागरिकांना मनस्ताप होत आहे. मात्र तिसऱ्या लाटेच्या धास्तीमुळे नागरिक लसीकरण केंद्रांवर गर्दी करीत आहेत.

चंद्रपुरात फक्त ७६ हजार जणांनीच घेतला डोसचंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रात ३ लाख ५५ हजार १६१ नागरिक लस घेण्यास पात्र आहेत. त्यापैकी बुधवारपर्यंत ७६ हजार ७०१ नागरिकांनी डोस घेतला. यामध्ये दुसरा डोस घेणाऱ्या ३३ हजार ३५ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. मनपाने केंद्र वाढवून पुरेशी  लस मिळत नाही. त्यामुळे लोकसंख्येच्या तुलनेत शहरातील लसीकरणाचे प्रमाणही अल्पच आहे.

लसीअभावी मोहिमेत खोडा६० वर्षांवरील नागरिकांना लस घेण्यासाठी चंद्रपूर मनपा क्षेत्रात सात आठ केंद्र सुरू असतात. परंतु, जास्त डोस मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना घरी परत जावे लागते. परिणामी, नागरिकांचे लसीकरण मंदावले आहे. पुरेसे डोस मिळाले तरच लसीकरण पूर्ण करून कोरोनाविरूद्ध लढा देऊन मात करता येऊ शकेल.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस