वरोरा: तालुक्यातील भोई समाज सहकारी संस्थेला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल येत्या ५ जून रोजी रविवारी स्थानिक कटारिया मंगल कार्यालयात सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी महसूल राज्यमंत्री संजय राठोड, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब वासाडे, आमदार बाळू धानोरकर, मत्सव्यवसाय राज्यमंत्री विजय देशमुख, वरोराच्या नगराध्यक्ष जनाबाई पिंपळशेंडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मनोहर पाऊनकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. नगरसेविका शिला रुयारकर यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच अपंग मुला-मुलींना तीन चाकी सायकलीचे वाटप, गुणवंत विद्यार्थी व बचत गटाचे उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दामोधर रुयारकर व न.प. माजी उपाध्यक्ष प्रकाश रुयारकर यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)
वरोरा येथे भोई समाजाच्यावतीने सुवर्ण महोत्सवाचे आयोजन
By admin | Updated: June 3, 2016 00:53 IST