शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची जमीन सरकार जमा करण्याचे आदेश

By admin | Updated: June 29, 2015 01:35 IST

तळोधी (बा) परिसरातील तळोधी, लखमापूर, वाढोणा, सावरगाव येथील शेतकरी सध्या तणावाखाली जगत असताना ...

तळोधी परिसरात खळबळ : महसूल विभागाकडून मनस्तापतळोधी : तळोधी (बा) परिसरातील तळोधी, लखमापूर, वाढोणा, सावरगाव येथील शेतकरी सध्या तणावाखाली जगत असताना महसूल विभागाने शेकडो शेतकऱ्यांच्या वहीवाटीतील हजारो एकर जमीन सरकार जमा करण्याचे आदेश काढल्याने एक खळबळ उडाली आहे. अशा आदेशामुळे त्यांना यापुढे आत्महत्येशिवाय पर्यायच नसल्याचे शेकडो शेतकऱ्यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले.पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांच्या वाडवडीलांनी २० ते ४० वर्षापूर्वी काही जमिनी खरेदी केली असून त्यांच्या वारसदाराकडे सदर जमिनीचा दस्तावेज उपलब्ध आहे. सदर शेतीच्या उत्पन्नावरच अनेक शेतकरी आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. सदर शेतीच्या वहीवाटीचा कार्यकाळ सर्वसाधारणपणे २०-४५ वर्षापर्यंतचा आहे. सदर जमीन शासकीय रेकार्डनुसार शेतकऱ्यांच्याच मालकीची असून त्यांनी या शेतीवरच शासनाच्या अनेक योजनेचा लाभही घेतला आहे. परंतु सर्व काही सुरळीत सुरू असतानाच अचानक महसूल विभागाकडून जमिनी सरकार जमा करण्याचे आदेश आले. संबंधित जमिनी भूमीधारी हक्कावर वाटप करण्यात आल्या असून याच्या खरेदी-विक्री व्यवहारात महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे नियम पुस्तिका खंड दोनचे नियम ८० अन्वये शर्तभंग झालेला आहे. करिता सदर जमीन सरकार जमा करण्यात येत असल्याची माहिती देऊन तहसील कार्यालयात आॅगस्ट २०१४ मध्ये शेतकऱ्यांची सुनावणीही घेण्यात आली होती.तद्नंतर तहसीलदार नागभीड व उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांच्याकडे अ‍ॅड. विजय सहारे यांनी शेतकऱ्यांची बाजू लेखी उत्तरासह स्पष्ट केली. परंतु सदर जमीन खरेदी-विक्री सक्षम महसूल अधिकाऱ्यांची रितसर परवानगी न घेतल्याने सदर जमीन सरकार जमा करण्यात हरकत नाही, असे सांगून शेतजमीन सरकार जमा करण्यात येते. अशा प्रकारचा आदेश संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. काही शेतकऱ्यांची प्रकरणे सुनावणीकरिता तहसीलदार नागभीड, उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांच्याकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे तळोधी(बा) परिसरातील लखमापूर सांझ्यातील भूमीधारी हवकाची जमीन खरेदी करून वहीवाट करणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांची झोप उडाली आहे, अशी माहिती निलेश पोशट्टीवार, श्रीराम बोरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. (वार्ताहर)या जमीन प्रकरणात झालेला खरेदी विक्रीचा व्यवहार हा अवैध असल्यामुळे महसुल विभागाने केलेली कारवाई योग्य आहे. परंतु सदर व्यवहार नियमित करण्याकरिता भरावी लागणारी रक्कम सर्वसामान्य शेतकऱ्यांना न परवडणारी असल्याने संबंधित शेतकऱ्यांचा मालकी हक्क कायम ठेवण्याकरिता शासनाने नवीन अध्यादेश काढणे गरजेचे आहे.-डॉ. सतीश वारजूकरमाजी जि.प. अध्यक्ष तथाविद्यमान जि.प. सदस्य,जि.प. चंद्रपूर